बच्चन कुटुंबात पुन्हा वाद?; सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

On: March 20, 2024 12:10 PM
Aishwarya Rai and Jaya Bachchan video goes viral
---Advertisement---

Aishwarya Rai | बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून रंगत आहेत. मात्र, अनेक कार्यक्रमात ऐश्वर्या बच्चन कुटुंबासोबत दिसून आली आहे.

नुकतीच ऐश्वर्या जामनगर येथे अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यात कुटुंबासोबत दिसून आली होती. मात्र, ऐश्वर्या आणि अभिषेक वेगवेगळ्या गाडीत येथे दाखल झाले होते. तसंच ऐश्वर्या नणंद श्वेता बच्चनलाही इग्नोर करताना दिसली होती. आता ऐश्वर्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

ऐश्वर्याच्या डोळ्यात अश्रू

ऐश्वर्याची सासू तथा ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन कधीकाळी आपल्या सुनेचे कौतुक करताना थकत नसत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.यामध्ये सासूबाई जया यांनी केलेल्या कौतुकामुळे ऐश्वर्या रायच्या (Aishwarya Rai)  डोळ्यात अश्रू आले होते.

हा व्हिडीओ तसा जुना आहे. मात्र, आता तो व्हायरल होत आहे. अभिषेक बच्चनसोबत लग्न झाल्यानंतर ऐश्वर्या आणि जया बच्चन फिल्मफेअर अवॉर्ड शोमध्ये गेल्या होत्या. या ठिकाणी जया यांनी आपल्या सुनेबद्दल अशा काही हृदयस्पर्शी गोष्टी सांगितल्या, ज्या ऐकून ऐश्वर्याला रडू कोसळलं होतं.

जया बच्चन नेमकं काय म्हणाल्या होत्या?

“मी पुन्हा एकदा एका सुंदर मुलीची सासू झाली आहे, जिच्याकडे खूप मूल्य आणि प्रतिष्ठा आहे. मला तिचं हसणं खूप आवडतं. बच्चन परिवारात मी तुझं स्वागत करते. मी तुला सांगू इच्छितो की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”, असं जया बच्चन म्हणाल्या होत्या. त्यांचे हे शब्द ऐकून ऐश्वर्याला तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवता न आल्याने रडू कोसळलं होतं.

ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि जया बच्चन यांचा हा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते यावर अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एकीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा असताना ती बच्चन कुटुंबात एकत्र फिरताना दिसते. त्यामुळे चाहत्यांनाही प्रश्न पडलाय की, नेमकं यांचं चाललंय तरी काय?, त्यात आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

News Title- Aishwarya Rai and Jaya Bachchan video goes viral

महत्वाच्या बातम्या- 

वसंत मोरेंचं ठरलं?; ‘या’ पक्षात जाणार?

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

चाहत्यांची चिंता वाढली, प्रेग्नंट दीपिका पादुकोणने घेतला मोठा निर्णय

‘तुझी खरी लायकी फक्त…’; मिटकरींनी काढली रोहित पवारांची लायकी

अजित पवारांनी न्यायालयाची आणि जनतेची माफी मागावी; शरद पवार गट आक्रमक

Join WhatsApp Group

Join Now