“मला असा जोडीदार हवा…”, ऐश्वर्या रायच्या वक्तव्याने बॉलिवूडमध्ये खळबळ!

On: March 10, 2025 7:51 PM
aishwarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | बॉलीवूडची सौंदर्यवती आणि करिष्माई अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांनी 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्यासोबत विवाह केला. दोघांना आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) नावाची मुलगी आहे. एकेकाळी आदर्श जोडप्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या जोडीबाबत सध्या विभक्त होण्याच्या चर्चांना वेग आला आहे.

ऐश्वर्याने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा-

अभिषेकसोबत विवाह करण्यापूर्वी ऐश्वर्याने (Aishwarya Rai)  एका मुलाखतीत तिच्या स्वप्नातील जोडीदाराविषयी बोलताना त्याच्यात कोणते गुण असावेत, हे स्पष्ट केले होते. ती म्हणाली होती की, मला असा जोडीदार हवा होता, जो मला मनापासून प्रेम करेल, कारण स्वभावतःच मी रोमँटिक आहे. तसेच, तिने स्वाभिमान आणि प्रतिष्ठेच्या महत्त्वावर भर दिला होता, कारण या दिखाऊ दुनियेत हे गुण दुर्मिळ असल्याचे तिने सांगितले होते.

‘उमराव जान’च्या सेटवर सुरू झाली प्रेमकथा-

अभिषेक आणि ऐश्वर्याच्या (Aishwarya Rai) प्रेमकथेची सुरुवात ‘उमराव जान’ चित्रपटाच्या सेटवर झाली. मात्र, त्याआधी अभिषेक ऐश्वर्याच्या सौंदर्याने भारावून गेला होता. स्वित्झर्लंडमध्ये तो एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला असताना, ऐश्वर्या ‘और प्यार हो गया’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती.

त्यानंतर ‘गुरु’, ‘धूम 2’ आणि ‘उमराव जान’ या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. अखेर ‘गुरु’च्या प्रीमियरला अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले आणि तिने आनंदाने होकार दिला.

लग्नाच्या पोशाखाची किंमत कोटींच्या घरात-

ऐश्वर्या रायच्या लग्नाच्या पोशाखाविषयी अनेक अफवा पसरल्या होत्या. काहींनी असा दावा केला की, तिचा पोशाख ७५ लाख रुपयांचा होता. मात्र, फॅशन डिझायनर निता लुल्ला (Neeta Lulla) यांनी एका मुलाखतीत या दाव्यांचे खंडन केले.

त्या म्हणाल्या की, ऐश्वर्याने साधा कांजीवरम साडी नेसली होती, ज्याची किंमत कोटींमध्ये जाणे शक्यच नाही. त्या साडीला एक सुंदर झरदोसी ब्लाउज जोडला गेला होता. शिवाय, निताने लोकांना ऐश्वर्याच्या मंदिरे शैलीतील दागिन्यांच्या किंमतीवर लक्ष केंद्रित करू नये, असे सांगितले.

News Title : Aishwarya Rai and Abhishek Divorce Rumors

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now