ऐश्वर्या-अभिषेकचं नक्कीच बिनसलंय; ऐश्वर्याने केलं असं काही की…

On: February 5, 2024 9:12 PM
aishawarya rai
---Advertisement---

Aishwarya Rai | अभिषेक बच्चन हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. 5 फेब्रुवारी 2024 हा अभिनेत्यासाठी खास दिवस आहे कारण तो 48 वर्षांचा झाला आहे. अभिषेकच्या वाढदिवशी, त्याच्या चाहत्यांनी आणि मित्रांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि त्यांच्या आवडत्या अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

अभिषेक बच्चन याचा 48 वा वाढदिवस

अभिषेकची बहीण, श्वेता बच्चन आणि भाची, नव्या नवेली नंदा यांनी देखील त्यांच्या भावासाठी आणि मामासाठी वाढदिवसाच्या सुंदर नोट्स लिहिल्या. याआधी बिग बींनी सकाळीच लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

अभिषेक बच्चनची बहीण श्वेता नंदा हिने तिच्या इन्स्टा हँडलवर त्याच्यासोबतचा बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे. जुन्या फोटोसोबतच त्याने आपल्या धाकट्या भावासाठी एक गोड चिठ्ठीही लिहिली आहे. बालपणीच्या चित्रात, भाऊ-बहीण जोडी पलंगावर बसून मिठाईचा आस्वाद घेताना दिसत आहे. मात्र पत्नी ऐश्वर्याने (Aishwarya Rai) साधा फोटो देखील शेअर न केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Aishwarya Rai | पहिल्यांदाच असं घडलं

पहिल्यांदाच असे घडले की, अभिषेक बच्चन याचा वाढदिवस असताना ऐश्वर्या राय हिने सोशल मीडियावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पोस्ट ही शेअर केली नाहीये.

ऐश्वर्या राय हिने (Aishwarya Rai) अभिषेकच्या वाढदिवसाच्या दिवशी पोस्ट शेअर केली नसल्याने परत एकदा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरू लागताना दिसत आहेत. ऐश्वर्या (Aishwarya Rai) राय हिने अभिषेक बच्चन याच्या वाढदिवसाला साधी पोस्टही शेअर केली नाहीये. दोघांमध्ये खरोखरच वाद सुरू आहेत का? हा प्रश्न आता परत एकदा विचारला जातोय.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वाद हे सातत्याने वाढताना दिसत आहेत. खरोखरच यांचे घटस्फोट होणार का याबद्दल चाहते विचारताना दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट!

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी!

वाढदिवसाच्या दिवशीच श्रीकांत शिंदे सापडले मोठ्या अडचणीत!

कैद्यांवर राहणार करडी नजर; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

‘या’ 6 कंपन्यांचे शेअर करतील मालामाल; गुंतवणुकीची सुवर्ण संधी गमवू नका

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now