242 प्रवासी, काही मिनिटांतच क्रॅश! बोईंग 787-8 ड्रीमलाइनरची खासियत आणि किंमत काय?

On: June 12, 2025 3:33 PM
Air India Crash
---Advertisement---

Air India plane crash | देशासाठी आणि एअर इंडियासाठी एक धक्कादायक दिवस ठरला आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथील विमानतळावर एअर इंडियाचे (Air India plane crash) एक प्रवासी विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानात सुमारे २५० प्रवासी व क्रू मेंबर्स होते. प्रारंभिक माहिती नुसार, विमान झेप घेतानाच काही क्षणांत त्याचा संपर्क तुटला व त्यानंतर अपघात झाला. AI 171 हे फ्लाईट लंडनकडे रवाना होत होते.

दुर्घटनेनंतर काय घडले? :

विमान कोसळल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले. या दुर्घटनेमुळे मेघानीनगर भागात प्रचंड घबराट पसरली. अग्निशमन दलाच्या सात गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफ आणि बीएसएफच्या तुकड्या सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. पोलिस आयुक्तांनी घटनास्थळी भेट दिली असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही गृहमंत्री अमित शहांशी संपर्क साधला आहे.

अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण करणारे हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलायनर होते. हे विमान ११ वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या ताफ्यात समाविष्ट झाले होते. हे अत्याधुनिक सुविधा असलेले, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरले जाणारे विमान असून जगभरातील अनेक प्रमुख विमान कंपन्यांकडे हे मॉडेल आहे.

Air India plane crash | बोईंग 787-8 ड्रीमलायनरची वैशिष्ट्ये :

प्रकार: लांब पल्ल्याचे प्रवासी विमान

इंजिन: नवीन जनरेशन इंजिन – कमी ध्वनी व उच्च कार्यक्षमता

इंधन टाकीची क्षमता: 1,26,000 लिटर

लांबी: 56.7 मीटर

पंखांची रुंदी: 60.1 मीटर

उंची: 16.9 मीटर

गती: 913 किमी प्रति तास

इंधन कार्यक्षमता: जुन्या 767 मॉडेलपेक्षा 20% अधिक

साहित्य: 50% कंपोझिट मटेरियल वापरले जाते – त्यामुळे वजन कमी आणि इंधन बचत

या विमानाची किंमत किती? :

बोईंग 787-8 ड्रीमलायनर ही खूप महागडी आणि अत्याधुनिक श्रेणीतील विमानप्रकार आहे. एका विमानाची अंदाजे किंमत 248 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच जवळपास 2,069 कोटी रुपये आहे. एअर इंडियाने हे विमान ११ वर्षांपूर्वी खरेदी केले होते आणि ते तेव्हापासून कार्यरत होते. (Air India plane crash)

अपघातानंतर तपासाची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली आहे. DGCA (Directorate General of Civil Aviation) तसेच बोईंग कंपनीचे प्रतिनिधी हे सुद्धा या प्रकरणाचा तपास करतील. ब्लॅक बॉक्स आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर सापडल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल.

News Title: Air India Plane Crash in Ahmedabad: Boeing 787-8 Dreamliner Crashes with 250 Onboard – Features and Cost Revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now