अंगावर काटा! भिंतींना भगदाड पाडून विमान आत शिरलं, डॉक्टरांचा जेवतानाच मृत्यू

On: June 12, 2025 4:51 PM
Ahmedabad Plane Crash Truth
---Advertisement---

Air India Plane Crash | गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच एअर इंडियाचं AI 171 हे प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही दुर्घटना थेट बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेल इमारतीवर घडल्याने अनेकांचा जीव धोक्यात आला आहे.

या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, हॉस्टेलवर कोसळलेल्या या विमानाचे फोटो समोर आल्याने दृश्य अधिकच अंगावर शहारे आणणारे ठरत आहेत. विमान कोसळतानाच मोठा स्फोट झाला आणि काही सेकंदांतच कॅन्टीनसह हॉस्टेल इमारतीला आग लागली. (Air India Plane Crash)

मेसमध्ये जेवत असलेल्या डॉक्टरांचा मृत्यू :

ही दुर्घटना दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर असलेली मेस नेमकी याच वेळेस भरलेली होती. सुमारे ५०-६० डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थी ताटावर जेवत असतानाच विमान थेट इमारतीवर आदळलं. या अपघातात काही डॉक्टर्सचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत.

प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, विमानाचा मागचा भाग इमारतीवर लटकलेला दिसत होता आणि आगीच्या धुराने संपूर्ण परिसर व्यापला होता. या आगीत अनेक खोल्यांचे भिंती कोसळल्या असून संपूर्ण हॉस्टेल इमारत धोकादायक स्थितीत आहे. (Air India Plane Crash)

Air India Plane Crash | आपत्कालीन यंत्रणा सक्रिय, परिसर सील :

दुर्घटनेनंतर अग्निशमन दल आणि आपत्कालीन वैद्यकीय पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, काहींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

या दुर्घटनेमुळे केवळ मेसच नव्हे, तर शेजारची हॉस्टेल इमारतही हादरली. अनेक विद्यार्थी धास्तावले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. संपूर्ण परिसर प्रशासनाने तातडीने सील केला असून, मृतांची संख्या आणखी वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

News Title: Air India Plane Crash: AI 171 crashes into hostel, doctors die during lunch – Gujarat tragedy

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now