Air India Plane Crash Video | एअर इंडियाचं AI171 हे विमान अहमदाबादमधून लंडनकडे जात असताना टेक ऑफनंतर अवघ्या दहा मिनिटांत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला असून, तो अत्यंत भयावह आहे. विमान कोसळताच मोठा स्फोट झाला असून, संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.
टेक ऑफनंतरच घडली मोठी दुर्घटना :
AI171 हे विमान अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या गॅटविककडे रवाना होतं. यामध्ये एकूण २४२ प्रवासी होते. मात्र उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दहाच मिनिटांत हे विमान जमिनीवर कोसळलं. मेघाणी नगर या रहिवासी भागात ही दुर्घटना झाली. विमान कोसळल्यानंतर लगेचच त्याने पेट घेतला.
घटनेचा सीसीटीव्ही व मोबाईल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विमान झपाट्याने खाली येताना दिसते आणि काही सेकंदात भीषण स्फोट होतो. परिसरात लोकांची धावपळ सुरू होते. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवांचे पथक तातडीने दाखल झाले आहे.
Air India Plane Crash Video | जीवितहानीची भीती, बचावकार्य सुरु :
सध्या दुर्घटनाग्रस्त भागात बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अनेकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप अधिकृत मृत्यूची संख्या स्पष्ट झालेली नाही, मात्र मोठ्या जीवितहानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Air India Plane crashes in Ahemdabad
Plane has crashed in Gujarat’s Meghani Nagar. The site where the plane crashed is believed to be a residential area. All roads to the area have been closed. Likely to be a passenger plane
Details awaited pic.twitter.com/2Jqr257aLL
— Nabila Jamal (@nabilajamal_) June 12, 2025
घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी संवाद साधून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. घटनास्थळी NDRF पथक पाठवण्यात आले असून, केंद्र सरकारकडून संपूर्ण मदत केली जात आहे.
एअर इंडियाचं स्पष्टीकरण :
एअर इंडियाने अधिकृत निवेदन देत सांगितले आहे की, “AI171 हे विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकसाठी रवाना झालं होतं. सध्या आम्ही या अपघाताच्या कारणांचा तपास करत आहोत. अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल.” प्राथमिक तपासात विमानाचा मागचा भाग झाडावर अडकला असल्याने संतुलन बिघडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.






