Air India Plane Crash | 12 जून रोजी अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडियाच्या (Air India Plane Crash) विमान अपघातानंतर केंद्र सरकारकडून (Central Goverment) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या दुर्घटनेतील सर्वात महत्त्वाचा तपासाचा भाग असलेला ब्लॅक बॉक्स सापडला असला, तरी त्यातील माहिती रिकव्हर होणे अत्यंत कठीण ठरत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तो तपासणीसाठी थेट अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. (Air India Plane Crash)
या अपघातात विमानाच्या ब्लॅक बॉक्सला (Black Box) आग लागल्यामुळे मोठे नुकसान झाले असून, भारतात उपलब्ध असलेल्या अद्ययावत प्रयोगशाळांमधून त्यातील डेटा मिळवणं शक्य झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर आता फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) या दोन्ही घटकांची सखोल तपासणी अमेरिकेतील अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये केली जाणार आहे.
अपघातात 242 पैकी फक्त एक प्रवासी बचावला :
12 जून रोजी एअर इंडियाचं बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळासाठी उड्डाण घेत असताना काही मिनिटांतच भीषण अपघाताला सामोरं गेलं. हे विमान बी. जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं आणि प्रचंड स्फोटासह मोठी आग लागली. (Air India Plane Crash)
या दुर्घटनेत विमानातील 242 पैकी केवळ एकच प्रवासी बचावला, जो ब्रिटनमधील भारतीय वंशाचा होता आणि तो विमानातील 11A या सीटवर बसलेला होता. या अपघातात परिसरातील 33 जणांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. (Black Box Sent to US)
Air India Plane Crash | भारतातील तंत्रज्ञान कमी पडले; आता अमेरिका करणार तपास :
विमानतळावर अपघातानंतर तातडीनं शोधमोहीम राबवून दुसऱ्याच दिवशी ब्लॅक बॉक्स (Black Box) सापडला होता. मात्र, त्यामधील डेटा जळाल्यामुळे व खराब झाल्यामुळे भारतातील कोणत्याही प्रयोगशाळेतून त्याची पुनर्प्राप्ती शक्य झाली नाही.
कॉकपिटमध्ये झालेले संभाषण आणि उड्डाणाशी संबंधित तांत्रिक डेटा या दोन्ही घटकांचा तपशील ब्लॅक बॉक्समध्ये नोंदवलेला असतो. आगीमुळे दोन्ही भाग खराब झाल्याने आता अमेरिकेतील विशेष प्रयोगशाळेचा आधार घेतला जाणार आहे. (Air India Plane Crash)
हवेत उड्डाण करताना विमानाच्या यंत्रणेमध्ये नेमका काय बिघाड झाला, त्याचे नेमके कारण काय होते, हे सर्व तपशील आता ब्लॅक बॉक्स तपासणीतूनच समोर येतील.
ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? :
विमान अपघाताच्या चौकशीसाठी ब्लॅक बॉक्स हे सर्वात महत्त्वाचं साधन मानलं जातं. यात दोन भाग असतात – फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) व कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR). एकामध्ये विमानाच्या गती, उंची, दिशा यासारखे तांत्रिक तपशील नोंदवले जातात, तर दुसऱ्यामध्ये वैमानिक आणि सहकारी यांच्यातील संभाषण रेकॉर्ड केलं जातं. या दोन्हीचा अभ्यास केल्यावर अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट करता येतं.






