Khushbu Rajpurohit Death | अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया AI-171 विमान दुर्घटनेत जोधपूरच्या खुशबू राजपुरोहित या नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. लंडनमध्ये डॉक्टर असलेल्या तिच्या पतीकडे जाण्यासाठी ती पहिल्यांदाच प्रवास करत होती. पण नियतीने त्या भेटीची संधीच दिली नाही.
पतीकडे जाण्याचा पहिलाच प्रवास ठरला अखेरचा :
खुशबू राजपुरोहित (Khushbu Rajpurohit Death) हिचं लग्न पाच महिन्यांपूर्वीच झालं होतं. तिचा पती लंडनमध्ये डॉक्टर असून, नवविवाहानंतर पहिल्यांदाच खुशबू त्याच्याकडे जाण्यासाठी सज्ज झाली होती. तिचा पासपोर्ट फक्त दोन दिवसांपूर्वीच तयार झाला होता. विमानात बसताना तिच्या चेहऱ्यावर उत्साह आणि डोळ्यांत स्वप्नं होती.
खुशबूने घरच्यांचा निरोप घेताना भावनांवर नियंत्रण ठेवलं नव्हतं. तिच्या निरोपाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती कुटुंबातील सदस्यांना मिठी मारत रडताना दिसते. कोणालाही कल्पना नव्हती की हा तिचा शेवटचा निरोप ठरेल. लग्नाच्या पाच महिन्यांनंतर नवऱ्याला भेटण्यासाठी तयार झालेली ही भेटच तिच्या जीवनाचा अंत ठरली.
Khushbu Rajpurohit Death | घरात आणि सासरच्या घरात शोककळा :
खुशबूच्या खाराबेरा (जोधपूर) येथील माहेरी आणि सासरी दु:खाचं वातावरण आहे. सुरुवातीला काहींना वाटत होतं की अपघात फारसा गंभीर नाही, पण जसजशी माहिती स्पष्ट झाली तसतशी आशा संपत गेली. सासरे आणि मेहुणे शक्ती सिंह राजपुरोहित यांना सुरुवातीला वाटत होतं की सून सुखरूप असेल. मात्र, घटनेचं गांभीर्य कळताच सर्वजण सुन्न झाले. (Khushbu Rajpurohit Death)
खुशबूच्या (Khushbu Rajpurohit Death) मृत्यूची अधिकृत माहिती मिळताच तिचे नातेवाईक तातडीने अहमदाबादला पोहोचले. गावात आणि जोधपूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने हाच मान्य करत सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले आहेत. संपूर्ण देशात या अपघाताने शोकच वातावरण निर्माण केलं आहे.






