अहिल्यानगर जिल्ह्यात घडली संतापजनक घटना! ४ बहिणींवर अत्याचार

On: September 19, 2025 1:19 PM
Ahilyanagar Crime
---Advertisement---

Ahilyanagar Crime | अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. एका नराधमाने स्वतःच्या लांबच्या नात्यातील चार सख्ख्या बहिणींवर वारंवार अत्याचार केला आहे. यात केवळ अल्पवयीन मुलीच नव्हे तर लग्न झालेली मोठी बहीणही वाचू शकली नाही. या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आई-वडिलांच्या विभक्ततेनंतर नातलगाची जबाबदारी :

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी एका दूरच्या नातलगाकडे सोपवण्यात आली होती. परंतु संरक्षण करण्याऐवजी याच व्यक्तीने त्यांचा विश्वासघात करत नराधमासारखं वर्तन केलं. आरोपीने चारही बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले आहे. (Ahilyanagar Crime News)

या प्रकरणाचा पर्दाफाश स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पातील कार्यकर्त्यांमुळे झाला. काही दिवसांपूर्वी लग्न झालेली मोठी मुलगी बहिणींना भेटायला आली असता आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. पीडितेने धाडस करून हा प्रसंग आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनी स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला. संस्थेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर राहुरी पोलिसांनी वेगाने कारवाई करून चौघी बहिणींची सुटका केली आणि आरोपी दांपत्याला अटक केली.

Ahilyanagar Crime | पीडित मुलींचं वय व मानसिक धक्का :

पीडित मुलींपैकी एक सज्ञान असून उर्वरित तिघी अनुक्रमे १६, १४ आणि १० वर्षांच्या अल्पवयीन आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या मुलींवर वारंवार लैंगिक शोषण होत असल्याचं तपासात उघड झालं आहे. चार महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या मोठ्या मुलीवरही आरोपीने वारंवार अत्याचार केला होता. तिच्या धाडसामुळेच हे प्रकरण बाहेर आलं. (Rahuri sexual abuse case)

या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अल्पवयीन मुलींच्या देखरेखीची जबाबदारी घेतलेल्या नातलगानेच अत्याचार करणं ही अत्यंत संतापजनक बाब असल्याचं सामाजिक संस्थांकडून सांगितलं जात आहे. पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. समाजातून या गुन्ह्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

News Title: Ahilyanagar Crime: Relative Arrested for Sexual Abuse of Four Sisters in Rahuri, Wife Also Detained

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now