महाकुंभातील अघोरी बाबा कालपुरुष साधूंची भीतीदायक भविष्यवाणी!

On: January 24, 2025 1:45 PM
Aghori Baba at Prayagraj Mahakumbh shocking prophecy on future 
---Advertisement---

Aghori Baba | सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमध्ये 95 वर्षीय अघोरी बाबा सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यांचं नाव बाबा कालपुरुष. भस्माने माखलेला त्यांचा लाल चेहरा, हातात मानवी कवटी आणि भारदस्त आवाज, या बाबाला पाहूनच थरकाप उडतो. या बाबाने अशात एक भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. (Aghori Baba)

बाबा कालपुरुष हे महाकुंभातील सर्वात जुने अघोरी साधू आहेत. त्यांचे अनेक अंदाज पाण्यावर केंद्रीत आहेत. त्यांचे पाणी टंचाई आणि आपत्तींवर आधारित अंदाज अनेक वेळा अचूक सिद्ध झाले आहेत.

बाबा कालपुरुष म्हणाले, ‘चिता जळून जाईल आणि हवा काळी होईल. माणूस विसरलेली प्रत्येक गोष्ट नदीला आठवते. गंगा जेव्हा रडते तेव्हा तिचे अश्रू मैदानावर पडतात. सुरुवात झाली आहे.’

बाबा कालपुरुष यांनी समोरच्या संगमाकडे बोट दाखवत सांगितलं, ‘मी गेल्या सात महाकुंभांना आलो आहे. प्रत्येक वेळी मी या भागात फिरलो, यावेळी चिन्हं वेगळी आहेत. स्मशान स्थळावर कावळे वेगळंच गाणं गात आहेत. मृत लोक अधिक अस्वस्थ आहेत. पृथ्वी आपला श्वास बदलत आहे.’

बाबा कालपुरुषांचे सर्वात महत्त्वाचं भाकीत महाकुंभाशी संबंधित आहे. ते म्हणतात की, ‘हा संगम बदलेल. नदी दुथडी भरून वाहत आहे. कालांतराने संगमाला नवीन जागा मिळेल. आज जिथे युद्ध आहे, भावी पिढ्या तिथं कुंभ आयोजित करतील. पर्वत बर्फ सोडतील. प्रथम हळूहळू, नंतर सर्व एकाच वेळी पवित्र नद्यांना नवीन मार्ग सापडतील. अनेक मंदिरे पृथ्वीवर परत येतील’, असंही ते म्हणाले.  (Aghori Baba)

कोणत्याही विनाशाचा उल्लेख नाही

बाबा कालपुरुषांच्या भविष्यवाण्यांमध्ये कोणत्याही विनाशाचा उल्लेख नाही. ते अस्खलित इंग्रजीत भाकीत करतात, ‘येणारा बदल पृथ्वीवर होणार नाही. मधली पिढी काय विसरली हे तरुण पिढीला आठवेल. आता जन्मलेल्या मुलांना आपण काय विसरलो ते आठवेल. ते वारा समजतील. पृथ्वी कधी फिरणार आहे हे त्यांना कळेल. तरुण पिढी पुन्हा आकाश वाचायला शिकेल.

कालपुरुष बाबाने अमावस्येच्या रात्री केलेले भाकीत भविष्यकाळाचे गुंतागुंतीचे चित्र मांडतात. मात्र, त्यांचा अंदाज खरा ठरतो की नाही हे येणारा काळच सांगेल.

कोण असतात हे अघोरी बाबा?

अघोरी साधू म्हटलं, की डोळ्यांसमोर जटा असलेले, अंगाला भस्म फासलेले, गळ्यात मानवी कवट्यांच्या माळ घालणारे साधू येतात. या रूपामुळेदेखील अनेकदा त्यांची भीती वाटते, मात्र त्यांच्या अघोरी या नावाचा अर्थ यापेक्षा अगदीच भिन्न आहे. सरळमार्गी असणारा, भीतीदायक नसलेला, कोणताही भेदभाव न करणारा असा याचा खरा अर्थ आहे. पंडित हितेंद्र कुमार शर्मा या भोपाळमधील ज्योतिषी व वास्तू सल्लागारांनी त्याबाबत मार्गदर्शन केलं आहे. (Aghori Baba)

अघोर पंथाचा इतिहास

काही प्रचलित मान्यतांनुसार, भगवान शंकरांना अघोरी पंथाचे प्रणेते समजलं जातं. असं म्हणतात, की शंकरांनीच अघोरी पंथाची निर्मिती केली होती. शंकरांचे अवतार असणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना अघोर शास्त्राचे गुरू मानलं जातं. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचा अंश घेऊन दत्तात्रेयांनी अवतार घेतला होता. अघोरी संप्रदायात बाबा कीनाराम यांची पूजा केली जाते. या संप्रदायातले अघोरी साधू शंकरांचे अनुयायी समजले जातात.

कुठे आणि कशी करतात साधना?

अघोरी स्मशानात तीन पद्धतीने साधना करताना आढळतात. पहिली स्मशान साधना, दुसरी शिव साधना आणि तिसरी शव साधना. अशा साधना कामाख्या पीठातील स्मशान, तारापीठ इथलं स्मशान, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैनच्या चक्रतीर्थ इथल्या स्मशानात केली जाते.

अघोरी जेव्हा मृतदेहावर पाय ठेवून साधना करतात, तेव्हा ती शिव आणि शव साधना समजली जाते. शंकरांच्या छातीवर पार्वती देवीनं पाय ठेवणं हे या साधनेचं मूळ समजलं जातं. नैवेद्य म्हणून मृतदेहाला मांस आणि मदिरा दाखवली जाते. तिसरी साधना स्मशान साधना असते. या साधनेत कुटुंबातल्या व्यक्तींनाही सहभागी करून घेतलं जातं. यात मृत व्यक्तीच्या स्थानी शवपीठाची पूजा केली जाते. या साधनेत मावा नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो. (Aghori Baba)

Title  :  Aghori Baba at Prayagraj Mahakumbh shocking prophecy on future

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now