प्रचाराचं भाषण संपवून बसले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं!

On: December 15, 2022 2:32 PM
---Advertisement---

लातूर | ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण संपवून खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीचा स्टेजवर मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने ही व्यक्ती दगावली.

मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव अमर नाडे असं आहे. ते मुरुड परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. अमर यांची पत्नी अमृता नाडे ह्या सरपंच पदाच्या उमेदवार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

पतीच्या मृत्यूने अमृता यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेनं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केल्यानंतर ते स्टेजवर असलेल्या खुर्चावर जाऊन बसले. पण अचानक त्यांच्या छातीत दुखून लागलं. काही कळायच्या आतच ते खुर्चीवरुन खाली कोसळले.

अमर नाडे यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच सगळेच हादरले. 

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now