Shraddha Murder Case | चौकशी दरम्यान अफताब पूनावालाचा मोठा खुलासा

On: November 29, 2022 2:38 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) हत्या प्रकरणात सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिसांच्या चौकशीत नवा खुलासा समोर आला आहे.

आरोपी आफताब पूनावाला याने पोलिसांना सांगितलं की, श्रद्धाला त्याच्याशी संबंध तोडायचे होते. ही गोष्ट त्याला त्रास देत होती. आफताबने श्रद्धाला मारण्याचा पूर्ण प्लानिंग केला होता. संधी मिळताच त्याने श्रद्धाची हत्या केली.

चौकशीत आफताब श्रद्धाला सतत मारहाण करत असे. रोजच्या या भांडणामुळे ती कंटाळली होती. यामुळे दुखावलेल्या तिने आफताबसोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता.

मृत्यूच्या काही दिवस आधी म्हणजे 3-4 मे रोजी श्रद्धाने आफताबला सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा प्रकार आफताबला समजताच त्याने श्रद्धाची हत्या केली.

श्रद्धा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एफएसएल टीमला आफताबच्या घरात किचनपासून बेडरूम आणि बाथरूमपर्यंत रक्ताचे डाग सापडले आहेत. याआधीही फॉरेन्सिक टीमला अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळून आले होते.

अलीकडेच श्रद्धाच्या वडिलांचा डीएनएही श्रद्धाच्या मृतदेहाच्या जप्त झालेल्या तुकड्यांशी जुळला होता. मात्र तपासात अद्यापही श्रद्धाचं शीर पोलिसांना सापडलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now