‘शरद पवारांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावं’; मित्राचा पवारांना प्रेमाचा सल्ला

On: August 31, 2023 12:50 PM
---Advertisement---

पुणे | सीरम इन्सिट्यूचे सर्वेसर्वा सायरस पुनावाला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना (Sharad Pawar) राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला आहे. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्त व्हावं, असं वक्तव्य सायरस पुनावाला यांनी केलं आहे.

माझं शरद पवारांना म्हणणं आहे की, त्यांना देशाचा पंतप्रधान होण्याची दोनवेळा संधी होती. पण त्यांनी ती संधी घालवली. कारण ते खूप फार हुशार आहेत. ते देशाची फार सेवा करु शकले असते. पण त्यांची संधी गेली. याबाबत मला जास्त वाटतं. आता त्यांचं वय झालं आहे. त्यांनी आता रिटायर व्हावं, असं वक्तव्य सायरस पुनावाला यांनी केलंय.

शरद पवार यांचं वयावरुन सातत्याने चर्चा होते. ते सध्या 82 वर्षांचे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाले तेव्हा त्यांनीदेखील शरद पवार यांना आता निवृत्त व्हा, असं वक्तव्य केलं होतं.

मिस वर्ल्ड 2023 स्पर्धेशी संबंधित एका कार्यक्रमात सायरस पुनावाला सहभागी झाले होते. यावेळी अजित पवार यांनी गेल्या महिन्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट संबंधित प्रश्नाला पुनावाला उत्तर देत होते. यावेळी त्यांनी पवारांना सल्ला दिला.

पूनावाला यांनी चांद्रयान-3 चांद्र शोध मोहीम यशस्वी केल्याबद्दल इस्रोचं कौतुक केलं. चंद्रावर यान यशस्वीपणे उतरवणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. त्यांनी ही कामगिरी एक मोठा सन्मान असल्याचं सांगितलं. या यशाचा एरोस्पेस उद्योगाला मोठा फायदा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now