आदिती तटकरेंना मोठा धक्का; पदाच्या नियुक्तीला स्थगिती

On: January 20, 2025 5:55 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Aditi Tatkare | राज्याच्या पलकमंत्र्यांची निवड गेल्या काही दिवसांपासून रखडली होती. त्यानंतर शनिवारी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री निवडण्यात आले. ही यादी जाहीर झाल्यावर अनेक नाराजीनाट्य सुरू झाले. (Aditi Tatkare)

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची निवड होताच भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले होते. तर नाशिकमध्येही दादा भुसे समर्थकांमध्ये नाराजी होती. अखेर रविवारी रात्री नवा जीआर काढत नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद निवडीला स्थगिती देण्यात आली आहे.

रायगडमध्ये मोठा राडा

आदिती तटकरेंना पालकमंत्रीपद दिल्यानंतर रायगडमध्ये तर मोठा राडा झाला. पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाल्यावर रायगडमध्ये भरत गोगावले समर्थक आक्रमक झाले. त्यांनी थेट मुंबई गोवा मार्गावर येत टायर पेटवून रास्ता रोको आंदोलंन केले होते.

तटकरे यांची वर्णी रायगडच्या पालकमंत्रीपदी लागल्यावर भरत गोगवले यांनी नाराजी व्यक्त केली होती. हा निर्णय धक्कादायक असल्याचं ते म्हणाले होते. मला पालकमंत्रीपद डावलने अपेक्षित नव्हते असे गोगावले म्हणाले होते.

दादा भुसे यांचीही नाराजी

दादा भुसे यांनी देखील नाराजी दर्शवली होती. यानंतर अखेर रविवारी रात्री नवा जीआर काढत नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपद निवडीला स्थगिती देण्यात आली आहे.

पालकमंत्री पदाची यादी जाहीर होताच एकाच दिवसांत दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ सरकारवर आली. या निर्णयामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Title : Aditi Tatkare Raigad guardian minister post cancelled

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now