अदिती राव हैदरीने गुपचूप उरकलं लग्न?; ‘या’ अभिनेत्याशी थाटला संसार?

On: March 28, 2024 5:37 PM
Aditi Rao Hydari and Actor Siddharth
---Advertisement---

Aditi Rao Hydari | बॉलिवूडमधील अनेक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी लग्न केलं. तसंच पुलकित सम्राट आणि कृति खरबंदा यांनीही नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर अभिनेत्री तापसी पन्नूनेही बॉयफ्रेंड मॅथियास बो याच्यासोबत लग्न केलं असल्याची माहिती मिळाली.

आता यात अजून एका अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्री अदिती राव हैदरीने बॉयफ्रेंड सिद्धार्थशी गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. तेलंगणामधील एका मंदिरात या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. सिद्धार्थ आणि अदिती हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.

अदितीने सिद्धार्थशी बांधली लग्नगाठ

अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari ) लवकरच तिच्या’हिरमंडी द डायमंड बाजार’ या आगामी वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. 27 मार्च रोजी या सिरिजसाठी एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिथे अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी पक्की झाली.

‘हीरामंडी’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यासाठी मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सिरिजमधील संपूर्ण कलाकार आले असताना, अदिती राव हैदरी गायब होती. ‘हिरामंडी’चा अदिती एक महत्त्वाचा भाग असल्याने तिच्या अनुपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)

काही मिडिया रिपोर्टनुसार कार्यक्रमाच्या होस्टने अदितीच्या अनुपस्थितीचं कारण सांगितलं आहे. “अदिती आज या कार्यक्रमात नाही. कारण तिचं आज लग्न होत आहे.”, असं होस्ट सचिन कुंभार यांनी म्हटलं असल्याची माहिती आहे.

अदितीने तेलंगणामधील मंदिरात केलं लग्न

अदिती (Aditi Rao Hydari ) आणि सिद्धार्थ यांनी तेलंगणामधील वनपार्थी जिल्ह्यातील श्रीरंगपुरम इथल्या रंगनायकस्वामी मंदिरात लग्न केलं असल्याचं म्हटलं जातंय. हे दोघं लवकरच त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार आहेत. 2021 मध्ये ‘महा समुद्रम’ या चित्रपटाच्या सेटवर अदिती आणि सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमात पडले. गेल्या वर्षी अदितीच्या 36 व्या वाढदिवशी, सिद्धार्थने तिच्यासोबतचा खास फोटो पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चां होत्या.

अदिती आणि सिद्धार्थ यांचं दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. सिद्धार्थने 2003 मध्ये लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. 2007 मध्ये त्याने घटस्फोट घेतला. तर अदितीचं पहिलं लग्न सत्यदीप नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. नंतर तिनेही घटस्फोट घेतला. आता सिद्धार्थ आणि अदिती यांनी दोघांनीही लग्नाबाबत अधिकृत अशी माहिती दिली नाही. मात्र, मिडियात याच्या जोरदार चर्चा आहेत.

News Title- Aditi Rao Hydari Tie The Knot With Actor Siddharth

महत्वाच्या बातम्या- 

निता अंबानींचा क्रिकेटमधला इंटरेस्ट संपला, चाहत्यांनी घेतली मुंबईच्या मालकांची फिरकी

‘ती’ चूक मुंबई इंडियन्सला पडली महागात; नंतर ट्रेव्हिस हेड थांबलाच नाही!

Video: हार्दिक पांड्याला रोहितच्या चाहत्यांकडून पुन्हा एकदा दणका, हैदराबादमधील हे 3 व्हिडीओ एकदा पाहाच

समोरची व्यक्ती खोटं बोलतीये की नाही?, ‘या’ 6 टिप्सद्वारे ओळखा

‘विराट काकाच्या मुलीला डेट करायचं’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Join WhatsApp Group

Join Now