अॅड गुणरत्न सदावर्ते यांना अटक होणार?

On: October 29, 2023 7:26 PM
---Advertisement---

ठाणे | मराठा आरक्षणाला विरोध करणारे अॅड गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला होता. माध्यमांशी बोलत असताना सदावर्ते म्हणाले होते की माझ्या गाड्या फोडून, मला मारुन तुम्हाला आरक्षण मिळणार आहे का?, असा सवाल त्यांनी केला.

सदावर्ते यांनी आरक्षणाला विरोध केला असताना राज्यात मराठा समाज आणखी आक्रमक होताना दिसत आहे. मात्र आता त्यांना अटक करण्यास सकल मराठा समाज आणि मराठा सेवा संघाने पत्राद्वारे मागणी केली आहे. आरक्षणाला त्यांचा विरोध आहे तसेच मनोज जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अटक करणयात यावी, अशी मागणी केली आहे.

ठाणे येथील कोपरी पोलीस ठाण्यात सदावर्तेंविरोधात तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मराठा समाजाचा शांततापूर्व आंदोलन सुरू असतानाही मराठा आरक्षणाला विरोध करून जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने गुणरत्न सदावर्ते हे बेताल आणि चितावणीखोर वक्तव्य करत आहे.

त्यामुळे सदावर्तेंच्या वक्तव्यांमुळे सामाजिक द्वेष निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी आणि त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्या चितावणीखोर वक्तव्यामागील चाणक्याचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now