स्वरा भास्करनं गुपचूप केलं ‘या’ राजकीय नेत्यासोबत लग्न

On: February 16, 2023 7:01 PM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) एक चांगली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती नेहमीच तिचं वक्तव्य मनमोकळेपणाने मांडत असते. विद्यमान सरकारवर हल्लाबोल करताना देखील पहायला मिळते. अनेकदा वेगवेगळ्या चित्रपटात स्वरा दिसते. याच स्वराने नुकताच कोणालाही न कळवता लग्न केलं आहे.

याबाबतील स्वराने स्वत: खुलासा केला आहे. तिनं तिच्या सोशल मीडिया (Social media) अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये स्वरानं तिची प्रेमकहाणी मांडली आहे. 6 जानेवारीला स्वरानं लग्न केलं आहे. लग्नाच्या 40 दिवसांनी व्हिडिओ टाकून या लग्नाचा खुलासा केला आहे. स्वरानं गुपचूप तिचं लग्न उरकलं आहे.

स्वरानं शेअर केलेल्या व्हिडीओत तिनं लिहलंय कधीकधी ‘तुम्ही स्वत:पासून दूर काहीतरी शोधता,पण ती गोष्ट तुमच्यासोबत असते. आम्ही प्रेम शोधत होतो,पण आम्ही मित्र झालो. त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना शोधलं. फहाद अहमद माझ्या हृदयात आपलं स्वागत आहे. मन गोंधळलेलं आहे,पण तुमचं आहे.’ असं तिनं लिहलं आहे.

स्वराने समाजवादी युवा सभेचे प्रदेशाध्यक्ष फहाद अहमद (State President of Samajwadi Youth Council) यांच्याशी लग्न केलं आहे. ते समादवादी पक्षाच्या महाराष्ट्र शाखेशी संबधित आहेत. फहाद अहमद स्वरापेक्षा 4 वर्षांनी लहान आहेत. दरम्यान स्वराच्या या अचानक आणि गुपचूप पार पडलेल्या लग्नामुळं स्वराच्या फॅन्सनां सुखद धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now