प्रसिद्ध अभिनेत्याकडून शरिर सबंधाची मागणी, अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

On: February 7, 2024 4:13 PM
ankita lokhande
---Advertisement---

Ankita Lokhande | प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेनी छोट्या पडद्यावरुन पदार्पण केलं. ‘पवित्र रिशता’ या हिंदी मालिकेतून अंकिता घराघरात झळकली. अंकिताच्या अभिनयामुळे प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं. सोशल मीडियावर अंकिता कायम सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती रोज नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत असते. अंकिता तिच्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच तिच्या पर्सनल लाईफमुळे देखील चर्चेत असते. दरम्यान तिने एक मोठा खुलासा केला आहे.

अंकिताला शरिर सबंधाची मागणी?

अंकिता लोखंडेनी (Ankita Lokhande) आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर केलं. दरम्यान एका मुलाखतीमध्ये बोलत असताना अंकिताने नवा खुलासा केला. अंकिता हिने झगमगत्या विश्वात आलेल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. वयाच्या 20 व्या वर्षी अंकिताला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागल्याचं तिने म्हटलं.

मुलाखतीमध्ये अंकिता म्हणाली की, एका साऊथ चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला बोलवलं होतं. या वेळेस मला कॉम्प्रोमाइज करण्यास सांगितलं होतं. ‘मी खूप सावध होते. शिवाय त्या खोलीत मी एकटीच होते. तेव्हा माझं वय 19 ते 20 वर्ष असेल. मी त्यांना विचारलं, निर्मात्यांसोबत कोणत्या गोष्टीसाठी तडजोड करावी लागेल. त्यांना पार्टी किंवा डिनरसाठी जायचं आहे का?’

पुढे काय घडलं?

अंकिता (Ankita Lokhande) पुढे म्हणाली की, ‘निर्मात्यांना कोणत्या गोष्टीसाठी कॉम्प्रोमाइज करायचं होतं हे यावेळी मला कळलं होतं. मात्र हीच गोष्ट मला त्यांच्या तोंडून ऐकायची होती. यावेळी मी त्यांना म्हणाले की, ‘तुमच्या दिग्दर्शकांना शारीरिक संबंधांसाठी मुलगी हवी आहे. काम करण्यासाठी त्यांनी एक उत्तम अभिनेत्री नकोय, आणि त्यानंतर मी तेथून निघून गेले.

घडलेल्या सगळ्या प्रकारानंतर त्यांनी माझी माफी देखील मागितली. पण मी त्यांना सिनेमासाठी स्पष्ट नकार दिला असं अंकिताने सांगितलं. याच वेळी नाही तर अंकितासोबतच पुन्हा असाच काहीसा किस्सा घडला असल्याचं तिने सांगितलं.

काय आहे प्रकार?

अंकितासोबत पुन्हा एकदा असाच प्रकार घडला. सिनेमामध्ये पदार्पण केल्यानंतर मला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला असल्याचा अंकिता म्हणाली. त्या अभिनेत्याने हात मिळवला. याठिकाणी मी त्या अभिनेत्याचं नाव घेणार नाही. कारण तो अभिनेता प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. तेव्हा देखील गोष्ट कॉम्प्रोमाइजवर येऊन थांबेल असं मला वाटलं होतं.’

News Title : actor demand ankita lokhande for physical relation

महत्त्वाच्या बातम्या-

कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतात

ईशा देओल आणि भरत तख्तानीच्या घटस्फोटाचं खरं कारण आलं समोर!

राज्यातील निवासी डॉक्टरांचा गंभीर इशारा; सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या

घड्याळ चिन्हाआधी शरद पवारांच्या पक्षाचं होतं ‘हे’ चिन्ह!

“जो आपला झाला नाही, तो जनतेचा काय होणार”

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now