Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, राहत्या घरी सापडला मृतदेह

On: March 12, 2026 4:28 PM
Actor Death
---Advertisement---

Actor Death|  सिनेसृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली असून, 50 हून अधिक चित्रपटांमध्ये बाल कलाकार म्हणून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्याचं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्यांचे निधन झाले असून राहत्या घरी त्याचा मृतदेह आढळला. या बातमीमुळे चित्रपटसृष्टी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून इतक्या लहान वयात त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

27 वर्षीय हा मल्याळम अभिनेता आहे रे हरी मुरली (Hari Murali). त्याने आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती आणि अल्पावधीतच त्यानी आपल्या प्रतिभेने मल्याळम चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले होते. त्याने मामुटी (Mammootty), पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांसारख्या मोठ्या स्टार्ससोबत पडदा शेअर केला होता. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या “अन्नम थामी” (Annam Thami) या चित्रपटात त्याने मामुटी यांच्यासोबत काम केले, ज्यातून त्यांना मोठी ओळख मिळाली.

याव्यतिरिक्त “उलकम चुट्टुम वलिबान” (Ulakam Chuttum Valiban), “डॉन” (Don), “पट्टनाथिल भूतम” (Pattanathil Bhootham) आणि 2015 मध्ये आलेल्या “अमर अकबर अँथनी” (Amar Akbar Anthony) यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांत त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. बालपणी मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्याचे शालेय जीवन आव्हानात्मक बनले होते. वर्गातील मुले त्यांच्याशी संवाद साधताना संकोचत असत, असा अनुभव त्यांनी एकदा व्यक्त केला होता. चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी आणि सामान्य जीवन यांचा मेळ घालणे त्यांच्यासाठी कठीण झाले होते.

अभिनय सोडून व्हीएफएक्स क्षेत्रात प्रवेश

गेल्या काही काळापासून हरी मुरलीने अभिनयापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता आणि ते व्हीएफएक्स (VFX) कलाकार म्हणून चित्रपट उद्योगात सक्रिय होता. तांत्रिक बाजू हाताळण्याकडे त्याचा कल वाढला होता आणि तिथेच आपले करिअर घडवत होता. त्याचा मृतदेह सध्या पय्यानूर येथील बेबी मेमोरियल हॉस्पिटलच्या (Baby Memorial Hospital) शवगृहात ठेवण्यात आला असून, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हरीच्या पश्चात त्यांची आई प्रसन्ना (Prasanna), वडील के.यू. मुरली (K.U. Murali) आणि भाऊ श्रीमुरारी (Srimurali) असा परिवार आहे. चित्रपटसृष्टीसाठी गेल्या दोन दिवसांतील ही तिसरी मोठी हानी आहे. 11 मार्च रोजी अभिनेत्री टिस्का चोप्रा (Tisca Chopra) हिच्या आईचे निधन झाले, त्यानंतर निक जोनास (Nick Jonas) याच्या बहिणीचे निधन झाले आणि आता हरी मुरलीच्या जाण्याने मल्याळम सृष्टीवर शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp Group

Join Now