स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलाबाबत धक्कादायक माहिती समोर!

On: March 13, 2025 9:12 AM
Swargate Bus Case
---Advertisement---

Swargate Bus Case l पुणे (Pune) स्वारगेट बसस्थानकात (Swargate Bus Stand) झालेल्या बलात्कार प्रकरणात, आरोपीच्या वकिलाने पीडितेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने पीडितेला ७५०० रुपये दिले होते, असा कोणताही युक्तिवाद न्यायालयात झाला नसतानाही, केवळ प्रसिद्धीसाठी वकिलाने माध्यमांशी बोलताना पीडितेचे चारित्र्यहनन केले.

वकिलाचे खोटे दावे आणि पोलिसांची सारवासारव :

वकिलाने खोटी माहिती देऊन पीडितेच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही पीडितेबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचे बोलले जात आहे. सुनावणीनंतर, अॅड. पोटे यांनी माध्यमांशी बोलताना, न्यायालयात पैशांचा कुठलाही युक्तिवाद झाला नसल्याची कबुली दिली. आरोपीनेच ही माहिती दिली होती, असा दावा करत त्यांनी सारवासारव केली.

आरोपीच्या वकिलाने पीडितेचे चारित्र्यहनन करणारी वक्तव्ये केल्याने, समाज माध्यमांवर पीडितेवर पुन्हा शाब्दिक बलात्कार झाले. यामुळे पीडितेला मानसिक त्रास झाला. या प्रकरणात दोषी कोण? आरोपीच्या बचावासाठी वकील इतक्या खालच्या थराला कसे जाऊ शकतात?, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दिवशी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याच्याकडील मोबाईलचा शोध घेण्यात येत आहे, मात्र तो अद्याप सापडलेला नाही. घटनेच्या अनुषंगाने त्यात महत्त्वाची माहिती असण्याची शक्यता पोलिसांनी न्यायालयास दिली. गाडे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Swargate Bus Case l आतापर्यंत तपासात काय झाले? :

  • घटनास्थळांचा पंचनामा
    – पिडीतेचा न्यायालयात जबाब
    – प्रत्यक्षदर्शी इतर साक्षीदारांकडे चौकशी
    – आरोपी व पिडीतेचे कपडे जप्त आणि वैज्ञानिक विश्लेषणासाठी पाठवले
    – आरोपी व फिर्यादीचे डीएनए सॅम्पल घेतले
    – आरोपीला कपडे पुरवण्यासाठी वकिलाची मागणी
    – आरोपीशी बोलण्यासाठी वकिलाने न्यायालयाकडे परवानगी मागितली

News title : Accused’s Lawyer Makes False Claims About Victim in Swargate Rape Case

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now