Rahul Gandhi | बिहारमध्ये न्याय यात्रेत मोठी दुर्घटना, राहुल गांधी थोडक्यात बचावले

On: January 31, 2024 3:07 PM
Accident with Rahul Gandhi in Bihar
---Advertisement---

Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) ‘भारत जोडो’ यात्रेनंतर पुन्हा एकदा भारत भ्रमण करण्यास निघाले आहेत. कॉँग्रेसने आता ‘भारत जोडो न्याय यात्रा’ (Bharat Jodo Nyaya Yatra) सुरू केली आहे. सध्या राहुल गांधी बिहारमध्ये असून त्यांच्यासोबत येथे मोठी दुर्घटना व्हायची टळली. यात्रे दरम्यान येथे मोठी चेंगराचेंगरी झाली. यातून राहुल गांधी थोडक्यात वाचले आहेत.

बिहारमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

बिहारमध्ये यात्रेदरम्यान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना शुभेच्छा देण्यासाठी जनतेने प्रचंड गर्दी केली होती. त्याचवेळी अचानकच चेंगराचेंगरी झाली. यावेळी राहुल गांधी यांच्या गाडीचे बरेच नुकसान झाले.यातून ते थोडक्यात बचावले आहेत. त्यानंतर त्यांनी कारमधून उतरून बसमध्ये बसण्याला प्राधान्य दिले.

यानंतर प्रशासनाने ही गर्दी नियंत्रित केली. आज (31 जानेवारी) या यात्रेचा 18 वा दिवस आहे. आज राहुल गांधी यांची यात्रा बिहारमधून बंगालमध्ये प्रवेश करणार आहे. ही यात्रा मिर्चाईबारी डीएस कॉलेजमार्गे लाभा येथे एक सभा घेणार आहे. यानंतर बंगालकडे मार्गस्थ होईल.

बिहारमध्ये राहुल गांधी यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. “ही यात्रा न्यायासाठी, आमचा हक्क मिळण्यापर्यंत चालूच राहील.”, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. आज बिहार कॉँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंह यांनी पश्चिम बंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांना राष्ट्रीय ध्वज दिला. कारण, बिहारमधून राहुल गांधी आता बंगालमध्ये जाणार आहेत.

बंगालमध्ये ममता यांनी काँग्रेसला रोखलं?

राहुल गांधी (Rahul Gandhi) बंगालमध्ये जाण्यापुर्वीच एक मोठी माहिती समोर आली आहे. काँग्रेसच्या यात्रेला ममता सरकारने परवानगी दिली नसल्याचं म्हटलं जात आहे. बंगाल कॉँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, एकीकडे ममता बॅनर्जी या मोदी यांच्याविरोधात मल्लिकार्जुन खरगे यांना उभे राहण्यास सहमती दर्शवत आहेत, आणि दुसरीकडे त्या काँग्रेसच्या कार्यक्रमाला परवानगीही देत नाहीत. त्यामुळे काँग्रेस आणि विरोधी पक्षात एकमत नसल्याचं म्हटलं जात आहे.

News Title- Accident with Rahul Gandhi in Bihar   

महत्त्वाच्या बातम्या –

Maratha Reservation | फडणवीसांच्या वक्तव्यामुळे जरांगे झाले सावध; मराठा समाजाला केलं महत्त्वाचं आवाहन

Maratha resevation | मराठा आरक्षणाविरोधात ओबीसींनी उचललं मोठं पाऊल!

Anil Babar passed away | मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन

“मला पटतं ते मी करतो लोक काय…”, तिसरं लग्न अन् Shoaib Malik नं अखेर सोडलं मौन

Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी

Join WhatsApp Group

Join Now