अभिनेता Shreyas Talpade च्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

On: December 15, 2023 12:14 PM
Shreyas Talpade
---Advertisement---

Shreyas Talpade | मराठी अभिनेता श्रेयस तळपदेला रात्री उशीरा हृदयविकाराचा झटका आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं चित्रीकरण उरकून तो घरी परतत असताना त्याला अस्वस्थ वाटू लागलं होतं. आता श्रेयसच्या प्रकृतीबाबत माहिती समोर आलीये.

डाॅक्टरांनी काय माहिती दिली?

श्रेयसची प्रकृती ठीक असून त्याला लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे. श्रेयसला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती त्याच्या चाहत्यांना आणि सह कलाकाराला कळताच त्यांना मोठा धक्का बसला.

नेमकं काय घडलं?

अभिनेता श्रेयस तळपदे ‘वेलकम टू जंगल’ या चित्रपटाचं चित्रीकरण संपून उशीरा घरी आला. त्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं आणि श्वास घ्यायला त्याला त्रास होऊ लागला. दरम्यान, श्रेयसला तातडीने मुंबईतील अंधेरीच्या बेलेव्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, रात्री उशीरा श्रेयसवर अँजियोप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या श्रेयसची प्रकृती ठीक असून त्याला लवकरच रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे.

दिवसभर श्रेयस शुटींगमध्ये व्यस्त होता. तिथे त्याची प्रकृती ठीक होती. शुटींगमध्ये त्याने अॅक्शन असलेले सीक्वेन्स शूट केले. शूट संपल्यानंतर तो घरी परतला. त्याने पत्नीला सांगितलं की त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं पण वाटेतच त्याला चक्कर आली.

इकबाल हा त्याचा पहिला हिंदी सिनेमा आहे. ओम शांती ओम या सिनेमात तो शाहरुख खानसह झळकला होता. काही चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करत लवकर बरा होवो…अशा शुभेच्छाही दिल्यात.

News Title : about shreyas talpade health update

थो़डक्यात बातम्या-

Lava | महागड्या फोन्सचे सर्व फीचर्स, सध्या अत्यंत स्वस्तात मिळतोय ‘हा’ खतरनाक फोन

Shreyas Talpade | मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदेला ह्रदयविकाराचा झटका

तारक मेहता मालिकेत सर्वात मोठा बदल, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री! – Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

मोठी बातमी! Ajit Pawar मुख्यमंत्री होणार?

INDvSA | मोहम्मद शमी भारतीय संघातून बाहेर?, समोर आलं अत्यंत धक्कादायक कारण

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now