Abhishek Ghosalkar Murder | काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची दहिसर येथे गोळ्या घालून हत्या (Abhishek Ghosalkar Murder) करण्यात आली होती. दहीसरमधील मॉरिसभाईच्या कार्यालयात अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई सोबतच फेसबुक लाईव्ह करत होते.
त्यानंतर मॉरिस भाई याने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडल्या. याचा व्हीडिओ तेव्हा चांगलाच व्हायरल झाला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
मॉरिसने घोसाळकर यांच्यावर जी पिस्तुल वापरून गोळ्या झाडल्या ती पिस्तुल त्याची नव्हे तर त्याच्या बॉडीगार्डची अमरेंद्र मिश्रा याची होती. त्यामुळे या हत्याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी त्यालाही अटक केली होती.
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट
आता अमरेंद्र मिश्रा याने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. मात्र आरोपी मॉरीसच्या या बॉडीगार्डला जामीन दिल्यास साक्षीदारांना धोका पोहोचू शकतो, असे निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
मिश्रा याने मॉरिसच्या सांगण्यावरून ऑफीसच्या लॉकरमध्ये बंदूक ठेवली होती. त्यामुळे मॉरिसने बॉडीगार्डसोबत मिळून घोसाळकर (Abhishek Ghosalkar Murder) यांच्या हत्येचा डाव केल्याचं समोर आलं आहे. अमरेंद्र मिश्रा याला 2002 मध्ये पिस्तूलाचं लायसन्स मिळालं होतं. मिश्राने उत्तर प्रदेशातून पिस्तुल नुतनीकरण केल्याचे पुरावेदेखील समोर आले आहेत.
पिस्तुलासाठी स्वत:च्या बॉडीगार्डसोबत मॉरिसने आखला डाव
हीच पिस्तुल मॉरिसने घोसाळकर यांच्या हत्येसाठी वापरली आहे. मॉरिस भाई याने हत्सेसाठी बंदुक मिळवण्यासाठी परवाना असलेला बॉडीगार्डलाच कामावर ठेवलं. कामावर ठेवताना त्याने गन कायम कार्यालयातील ड्रॉव्हरमध्ये ठेवायची अशी अट घातली असल्याची माहिती मिश्रा याच्या पत्नीने दिली आहे. त्यामुळे हा सर्व डाव अगोदरच ठरला असल्याचं यातून दिसून येतं.
News title – Abhishek Ghosalkar Murder case update
महत्त्वाच्या बातम्या-
‘निर्धार महाविजयाचा’; बारामतीत सुनेत्रा पवारांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी
“शरद पवारांच्या सल्ल्यानेच भाजपमध्ये…”, एकनाथ खडसे यांचं मोठं वक्तव्य
‘एका तासाची सोय होईल?’, अभिनेत्री वनिता खरातचा अत्यंत धक्कादायक खुलासा
…म्हणून भाजपला 400 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
अर्जुन तेंडुलकरची घातक गोलंदाजी! भारी यॉर्कर अन् इशान चीतपट, Video






