अभिषेक बच्चनने ऐश्वर्या सोबतच्या भांडणाबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला..

On: February 12, 2024 3:56 PM
Abhishek Bachchan
---Advertisement---

Abhishek Bachchan | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्याच्या चर्चा रंगत आहेत. दोघांत काहीतरी बिनसल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नाहीतर, लवकरच ऐश्वर्या अभिषेकला घटस्फोट देणार असल्याचं सांगितलं जात आहे. या चर्चेदरम्यानच आता स्वतः अभिषेकने मोठा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय हिच्यासोबत असलेल्या रिलेशनवर भाष्य करताना दिसून आला. त्याच्या वाढदिवशी ऐश्वर्याने खास पोस्टही केली होती. आता त्याच्या एका मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काय म्हणाला अभिषेक बच्चन?

अभिषेकने (Abhishek Bachchan) एका मुलाखतीमध्ये वाद-विवादावर भाष्य केलं आहे. काहीही झालं तरी माफी मलाच मागावी लागते. तसेच चूक कोणाची आहे आणि कोणत्या गोष्टीवरून आपण वाद करतो हे महत्वाचं नाही, असं अभिषेक म्हणाला आहे.

आमच्यात जेव्हा कधी वाद होतात तेव्हा मीच पुढाकार घेत माफी मागत असतो, हे फक्त मीच नाही तर जवळपास सर्वच पुरूष असे करत असतील. आमची कितीही भांडणे झाली किंवा वाद झाले तरीही ते वाद मिटवल्याशिवाय झोपायचं नाही, हा नियमच आम्ही बनवला असल्याचं अभिषेकने सांगितलं.

अभिषेकने पुन्हा एकदा ऐश्वर्यासोबत मोठ्या पडद्यावर काम करण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे. याचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल झाला. आराध्या, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे विदेशात सुट्टीसाठी गेले होते. त्यांचा हा व्हिडीओ बघून चाहत्यांना प्रचंड आनंद झाला.

अभिषेकचा (Abhishek Bachchan) हा व्हिडीओ तसा जुना आहे, मात्र आता तो व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून त्यांचे हे व्हिडीओ पसंत केले जात आहेत. दोघांनी वेगळे होऊ नये, अशी इच्छा सर्वच चाहते व्यक्त करत आहेत. त्यांच्यात नेमकं काय चाललंय याबाबत अधिकृत काहीच माहिती नाही. पण ते दोघेही एकत्र बऱ्याच कार्यक्रमात हजेरी लावत असतात.

अभिषेक-ऐश्वर्या वेगळे होणार?

ऐश्वर्या राय बच्चन ही आता 43 वर्षांची झाली आहे. 1 नोव्हेंबर 1973 रोजी जन्मलेल्या ऐश्वर्याला चित्रपटाच्या सेटवर अभिषेकशी प्रेम झाले. बराच काळ डेट केल्यानंतर 20 एप्रिल 2007 रोजी दोघांनी लग्न केले. विशेष म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा (Abhishek Bachchan) 3 वर्षांनी मोठी आहे. आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत.

News Title-  Abhishek Bachchan big revelation about Aishwarya

 महत्त्वाच्या बातम्या –

मोठी गुड न्यूज! सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या दर

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

पुणे पोलिसांच्या नाकाखालून गुन्हेगार पळाला!, शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा ससूनमधून फरार

शोएबसोबतच्या घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सानिया झाली स्पॉट; पापाराझींची घेतली फिरकी, Video

“राज्यात राष्ट्रपती राजवट कशासाठी लावा? तुमच्या काळात केंद्रीय मंत्र्याला…”, मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Join WhatsApp Group

Join Now