अभिषेक बच्चनमुळे ‘ही’ अभिनेत्री गेली होती डिप्रेशनमध्ये; धक्कादायक कारण समोर

On: May 2, 2024 12:03 PM
Abhishek Bachchan
---Advertisement---

Abhishek Bachchan | बाॅलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांंध्ये अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या दोघांची चांगलीच चर्चा सुरु आहे. या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा असल्याचं समोर येत होतं. एवढंच नाही तर या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघे लग्नबंधनात अडकले होते. परंतु त्या आधी अभिषेक आणि बाॅलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर या दोघांचा साखरपुडा झाला होता. मात्र काही कारणामुळे तो मोडला.

का मोडला साखरपुडा?

करिश्मा आणि अभिषेक (Abhishek Bachchan) यांचा साखरपुडा 2002 साली पार पडला होता. आपल्या करियरमध्ये करिश्मा खूप पुढे गेली होती आणि यशस्वी देखील होती. मात्र अभिषेक बच्चन बॉलिवूडमध्ये त्याची ओळख निर्माण करण्यात, खंबीरपणे पाय रोवण्यात व्यस्त होता. दरम्यान आपली मुलीचं चांगलं भाविष्य असावं असं करिश्माची आई म्हणजेच बबिता कपूरला वाटतं होतं.

आणि म्हणून बबिता कपूर यांना अमिताभ आणि जया बच्चन, यांच्याकडून आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी एक ‘ॲग्रीमेंट’ करुन घ्यायचं होतं अशा चर्चा होत्या. मात्र, त्या ‘ॲग्रीमेंट’ वर अमिताभ आणि जया बच्चन यांच्याही सह्या हव्या होत्या. अमिताभ बच्चन यांनी अशा कोणत्याही करारावर सही करणार नसल्याचं स्पष्टपणे नाकारलं. म्हणून अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचं नातं तुटलं.

करिश्मा कपूर डिप्रेशनमध्ये-

अभिषेक (Abhishek Bachchan) आणि करिश्माच्या ब्रेकअपची आलेली बातमी त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. त्यांची एंगेजमेंट कशी तुटली असा प्रश्न सर्वांना पडला होता. एवढंच नाहीतर काही काळ करिश्मा डिप्रेशनमध्ये होती. नंतर 2003 साली करिश्मा कपूरने दिल्लीतील उद्योगपती संजय कपूर यांच्याशी लग्न केलं.

अभिषेक ऐश्वर्याचं लग्न-

पुढे 2007 मध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचं लग्न झालं. 20 एप्रिल 2024 ला दोघांच्या लग्नाला 17 वर्षपूर्ण झाली. काही दिवसांपूर्वी अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यामध्ये सर्व काही ठिक नसल्याचं म्हटलं जात होतं. एवढंच नाही तर या दोघांचा घटस्फोट देखील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

News Title : Abhishek Bachchan and karishma’s relation

महत्त्वाच्या बातम्या-

“दमदाटी करायची भाषा करणं सोडून द्या नाहीतर…”, अमोल कोल्हे अजित पवारांवर कडाडले

“मी इतक्या लाख मतांनी विजयी होईल”, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य

ऐश्वर्याला दिग्दर्शकाने केला होता चुकीचा स्पर्श, सलमानने…; अभिनेत्रीचा मोठा खुलासा

पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर- मुरलीधर मोहोळ

“थोडं कमी पीत जा”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ तूफान व्हायरल

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now