पहिल्या फेरीत अभिजित बिचुकलेंना मिळाली ‘इतकी’ मतं

On: March 2, 2023 10:36 AM
---Advertisement---

पुणे |  कसबा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाल मतांची मतमोजणी सुरु झाली. 

पहिल्याच फेरीत रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना 3000 मतांची आघाडी मिळाली होती. मात्र या फेरीत धंगेकरांच्या आघाडीपेक्षा एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली होती. ती म्हणजे अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) आणि ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना पडलेल्या मतांची.

अभिजित बिचुकले यांना पहिल्या फेरीत अवघी ४ मतं मिळाली आहेत. तर आपल्याला कसब्यातील ब्राह्मण समाजाचा मोठा पाठिंबा मिळेल, असा दावा करणाऱ्या आनंद दवे यांना पहिल्या फेरीत फक्त 12 मतं मिळाली आहेत.

या वॉर्डातून हेमंत रासने यांना आघाडीची मोठी आशा होती. परंतु रासने यांच्या पदरी निराशा पडलीये. कारण सदाशिव पेठेतून रवींद्र धंदेकर यांना निर्णायक आघाडी मिळाली आहे. सहाव्या फेरीअखेर धंगेकर 3 हजार मतांनी आघाडीवर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now