Abhijeet Patil | माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक खूपच रंजक मार्गावर गेली आहे. येथे धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपाशी बंडखोरी करत महाविकास आघाडीसोबत मैत्री केली. मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) माढ्याचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, ते अयशस्वी ठरले.
मोहिते पाटील यांना श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिखर बँकेने चारशे कोटी रुपयांच्या थकबाकीचे कारण देऊन अभिजित पाटील यांच्या कारखान्याची तीन गोदामे सील करण्यात आली होती. यामध्ये सुमारे 14 हजार क्विंटल साखर अडकून पडली होती.
फडणवीसांच्या भेटीनंतर जप्ती लगेच मागे
अभिजित पाटील यांनी या कारवाईनंतर लागलीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन माढा आणि सोलापूर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. या राजकीय नाट्यमय घडामोडीची राजकारणात चर्चा रंगली आहे.
फडणवीस यांच्या भेटीनंतर अभिजित पाटील (Abhijeet Patil) यांचं संकट जणू उडूनच गेलं. महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं जणू रिटर्न गिफ्टच अभिजित पाटील यांना मिळालं आहे. कारण राज्य सहकारी बँकेने थकबाकीच्या कारणावरून पंढरपुरातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारवाई आता मागे घेतली आहे.
केलेली कारवाई ही बेकायदा आणि लहरीपणाची असल्याची टिप्पणी करत कारखान्याची गोदामे सीलमुक्त करून पाच मेपर्यंत त्यांचा ताबा पुन्हा कारखान्याकडे देण्याचे आदेश पुण्याच्या कर्ज वसुली लवादाने दिले आहेत. त्यामुळे अभिजित पाटील यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या राजकीय घडामोडींमुळे माढ्यातील निवडणुकीत आणखी रंगत भरली आहे.
शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका
यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”अभिजित पाटील (Abhijeet Patil ) यांना जनतेचा पाठिंबा असून, त्यांच्या मनात आमच्याबद्दल आस्था आहे. म्हणूनच सत्ताधाऱ्यांनी त्यांना अडचणीत आणलं. त्यांच्या कारखान्यातील दहा लाख टन साखर जप्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे, कामगारांचे वेतन अडकून बसले. त्यामुळे पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला. त्याबाबत मी त्यांना दोष देत नाही.”, असं शरद पवार म्हणाले आहेत.
News Title – Abhijeet Patil Sugar Factory Gets Relief In Forfeiture Proceedings
महत्त्वाच्या बातम्या –
महत्वाची बातमी! आरोग्य विमा घेणाऱ्यांना आणखी एक मोठा धक्का
सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत वाढ, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस
सुषमा अंधारेंचं हेलिकॅाप्टर कोसळलं, काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर
कोपर्डी बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट; …त्याला स्मशानभूमीत रात्रभर नग्न बसवले
मोठी दुर्घटना! हेलिकॉप्टर झालं क्रॅश; सुषमा अंधारे अन् पायलट…






