…म्हणून अब्दुल सत्तारांना गावकऱ्यांनी हुसकावून लावलं!

On: October 23, 2023 11:32 AM
---Advertisement---

मुंबई | जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीत राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. तसेच मराठा समाजानेही गावागावात नेत्यांना प्रवेशबंदी केली आहे. आतापर्यंत राज्यातील 500 हून अधिक गावात पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचा फटका राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांना बसलाय. त्यांना गावकऱ्यांनी गावात येण्यापासून रोखलं आहे. पण वेगळ्या कारणासाठी सत्तारांना हुसकावून लावण्यात आलं.

अब्दुल सत्तार हे सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सावरणी येथे आले होते. गावातील रहिवाशांना दसरा मेळाव्याचं निमंत्रण देण्यासाठी ते आले होते. सोबत त्यांनी मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकाही आणल्या होत्या. सत्तार यांचा ताफा गावात येताच संपूर्ण गाव जमा झाला. गावकऱ्यांनी ‘अब्दुल सत्तार चले जाव’च्या घोषणा दिल्या.

या गावात काही दिवसांपूर्वी दोन मुस्लिम महिलांचा मृत्यू झाला होता. या महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. राजकीय दबावामुळे याची चौकशी होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. यामुळे त्यांना येण्यापासून रोखण्यात आल्याचं सांगितलं जातं.

सत्तार यांना गावात येण्यापासून रोखण्यात आल्याची चर्चा संपूर्ण सिल्लोड तालुक्यात पसरली आहे.  सत्तार गेल्यानंतरही गावकरी गावाच्या वेशीवर थांबूनच होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now