“रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करावं, अशी माझी इच्छा होती”

On: November 26, 2022 12:51 PM
Rashmi Thackeray
---Advertisement---

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री, आमदार पुन्हा गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जात आहेत. पण या गुवाहाटी दौऱ्यात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) मुख्यमंत्र्यांसोबत असणार नाहीत. ते सध्या नाशकात आहेत. त्यामुळे अब्दुल सत्तार नाराज असल्याचं बोललं जात आहे.

नाराजीच्या चर्चांवर सत्तार यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे आणि माझ्या संबंधांमध्ये कुठलाही दुरावा नाही. मी कुणावरही नाराज नाही, असं ते म्हणालेत.

माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. इथं माझी काही कामं असल्याने मी थांबलोय, असं स्पष्टीकरण सत्तार यांनी दिलं आहे. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी मोठं वक्तव्य केलंय.

रश्मी वहिनींना मुख्यमंत्री करा, असा प्रस्तावही मी ठेवला होता. कारण अडीच वर्षात काळात उद्धव ठाकरे फक्त 4 वेळा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलेले दिसलेले, असं सत्तार म्हणालेत.

मी मंत्री असूनही त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलेलं बघितलं नाही. तर सर्वसामान्य लोकांना ते काय दिसणार?, अशी टीका त्यांनी केलीये.

दरम्यान, ठाकरे घरणाच्या दुसऱ्या व्यक्तीला मुख्यमंत् करावं असं माझं मत होतं. मी मला मुख्यमंत्री करा म्हणालो नव्हतो, तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याबाबत बोललेलो, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now