58 वर्षांच्या आमिर खानला करायचाय ‘रोमान्स’, थेट म्हणाला…

On: February 6, 2024 4:32 PM
Aamir Khan big statement
---Advertisement---

Aamir Khan | अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आपल्या एका वक्तव्यामुळे सध्या चर्चेत आला आहे. नुकत्याच एका मुलाखतमध्ये आमिरला चित्रपटांत रोमॅंटिक भूमिका करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर आमिरने दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा होत आहे.

काय म्हणाला आमिर खान?

एखाद्या चित्रपटाची कथा रोमँटिक असेल तर असा चित्रपट करायला मला नक्कीच आवडेल. या वयात रोमान्स करणं थोडं अनकॉमन असतं. मात्र, ती भूमिका माझ्यासाठी योग्य वाटत असेल तर मी नक्कीच त्यासाठी काम करेल, असं आमिर (Aamir Khan) म्हणाला.

माझ्या वयानुसार मला साजेशी भूमिका करायला आवडेल. मला आता सध्या जर एका तरुण मुलाची भूमिका दिली जो फक्त 18 वर्षांचा असेल तर मला ते करायला अवघड जाईल, किंवा मी ते नाही करू शकणार, असंही आमिर म्हणाला. त्यामुळे माझ्या वयाला सूट करेल अशी भूमिका मला करायला नकीच आवडेल, असं आमिर (Aamir Khan) म्हणाला.

बॉलिवूड कलाकार अनेकदा पडद्यावर त्यांच्या खऱ्या वयापेक्षा कमी वयाच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसतात. ‘3 इडियट्स’या चित्रपटामध्ये आमिरने एका कॉलेज स्टुडंटचा रोल केला होता. मात्र, आता तो एवढा तरुण रोल नाही करू शकत असल्याचं त्याने स्वतः म्हटलं आहे.

‘या’ चित्रपटानंतर आमिरने घेतला ब्रेक

2022 मध्ये रिलीज झालेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटापासून आमिर खान (Aamir Khan) सध्या ब्रेकवर आहे. याआधी त्याचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा हॉलिवूडचा ऑस्कर विजेते चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा रिमेक होता. मात्र, चाहत्यांना तो भावला नाही.

यामध्ये अभिनेत्री करीना कपूर मुख्य भुमिकेत होती.चित्रपटातील गाणी हीट झाली. मात्र, कथा प्रेक्षकांना रुचली नाही. यात आमिरने तरुण भूमिका केली होती. आता तो लवकरच कमबॅक करणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे लवकरच त्याच्या आगामी प्रोजेक्टची तो घोषणा करू शकतो.

News Title-  Aamir Khan wanted to play a romantic role

महत्त्वाच्या बातम्या –

“मिर्झापुर सीरिज पाहिलीत तर तुम्हाला उलटी येईल”

लेकापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अडचणीत; ‘त्या’ फोटोने नवा वाद

टीम इंडियाच्या चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर!

“देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी…”, अमृता फडणवीसांची उखाण्यातून टोलेबाजी

“मला मारून टाका, फासावर लटकवा पण..”, Poonam Pandey ची पुन्हा एकदा वादग्रस्त पोस्ट

Join WhatsApp Group

Join Now