Crime | आपल्यांनीच घात केला; शेतीच्या वादातून घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

On: December 16, 2023 1:22 PM
Crime
---Advertisement---

Crime | कित्येकदा शेतीच्या वादातून कुटुंब उध्वस्त होताना आपण पहिलं असेल. शेतीचा वाद कधी कोणत्या थराला जाईल सांगता येणार नाही. अशाच एक अत्यंत धक्कादायक घटना यवतमाळमध्ये घडलीये. यामुळे संपूर्ण जिल्हाच हादरला आहे.

शेतीच्या वादातून महिलेची हत्या (Crime News) झाल्याचं समोर आलं आहे. संपूर्ण जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

Crime | नेमकं काय घडलं?

यवतमाळच्या मंगरुळ येथील एक महिला गेल्या 14 दिवसांपासून बेपत्ता होती. महिलेच्या पतीनं यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली. 30 नोव्हेंबरच्या सकाळपासून ही महिला बेपत्ता होती. त्यानंतर महिलेच्या पतीनं तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनला 1 डिसेंबरला महिला हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

तक्रारीनंतर पोलिसांनी महिलेचा शोध घेण्यास सुरूवात केलेली. त्यानंतर उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला होता.

Crime | हत्येचं कारण समोर

पोलिसांनी महिलेसंदर्भात घरच्यांची चौकशी केली तेव्हा दिराने तिचा खून केल्याचं समोर आलं. शेतीच्या हिस्स्याच्या वादातून तसेच एक एकर शेती विक्री करण्यास अडथळा आणत असल्यानं हत्या केल्याची कबुली महिलेच्या दिरानं दिली.

महिलेच्या दिरानं हत्या केल्याचं समोर आलं आहे. शेतीच्या वादातून हत्या केल्याचं समोर आलं. साधना संजय जोगे असं मृत महिलेचं नाव आहे. नाना उर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण जोगे असं आरोपीचं नाव आहे. महिलेचे पती संजय जोगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास यावतमाळ ग्रामीण पोलीस ठाणं करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘फ्रेंड्स’ फेम Matthew Perry च्या मृत्यूचं कारण समोर; ऑटोप्सी रिपोर्टमधून मोठा खुलासा

Ratan Tata | प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांबाबत चिंताजनक माहिती समोर!

रोहितला कर्णधारपदावरून काढल्यानंतर Mumbai Indians ला मोठा धक्का!

Mumbai Indians | “आजपासून मी मुंबई इंडियन्सचा चाहता नाही”; लाखो जणांनी सोडली साथ!

Rohit Sharma चा ‘हा’ रेकॉर्ड मोडणं सोप्प काम नाही; हार्दिकलाही जमणार नाही

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now