Parliament | आताची सर्वात मोठी बातमी! लोकसभेत घडला धक्कादायक प्रकार

On: December 13, 2023 1:41 PM
MPs Suspended
---Advertisement---

नवी दिल्ली | लोकसभेच्या (Parliament) सुरक्षेत मोठी चूक झाली असून संसदेत एक अज्ञात व्यक्ती शिरल्याने खळबळ उडाली आहे. संसदेवर हल्ला झाल्याच्या घटनेला आज बावीस वर्ष पूर्ण झाली आहेत अशात ही घटना घडलीये.

प्रेक्षक गॅलरीतून दोन जणांनी उड्या घेतल्याने कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. यावेळी
एकच गोंधळ उडाला.

नेमकं काय घडलं?

बुधवारी लोकसभेचं कामकाज सुरू असताना दुपारी एकच्या सुमारास एका प्रेक्षकाने सभागृहात उडी मारली, त्यानंतर कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सभागृहात शून्य प्रहरात दुपारी एकच्या सुमारास एका व्यक्तीने प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली आणि इकडे तिकडे धावायला सुरुवात केली.

संसदेवरील हल्ल्याच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त सभागृहाच्या सुरक्षेतील मोठी चूक झाली आहे. लोकसभा गॅलरीतून काही लोकांनी सदनमध्ये उडी घेतली. त्यांनी घोषणाबाजी करत सभागृहात धुमाकूळ घातला.

पाहा व्हिडीओ –

महत्त्वाच्या बातम्या- 

Ravindra Berde | मरणापूर्वी ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त होते रवींद्र बेर्डे

कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद?; Amitabh Bachchan यांनी उचललं मोठं पाऊल

CAR | भारीच की! Tata पासून Maruti पर्यंत ‘या’ गाड्यांवर दीड लाखाचा डिस्काऊंट

Rinku Singhच्या बॅटमधून निघाला आग ओकणारा बॉल, Video पहाल तर थक्क व्हाल!

UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now