तुनिषा शर्मा प्रकरणात नवा ट्विस्ट, सिझानच्या कुटुंबाला अटक होणार?

On: February 2, 2023 11:46 AM
---Advertisement---

मुंबई | अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. अभिनेत्री तुनिषा शर्मानं 24 डिसेंबर रोजी शुटिंगच्या सेटवर आत्महत्या केली होती. यानंतर तिचा बायफ्रेंड सिझाननं तिला मारलं असल्याचा आरोप वारंवार तुनिषाच्या कुटुंबाकडून केला जात आहे.

25 डिसेंबरला तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी सिझानला (Sizan) अटक केली होती. तुनिषाच्या आईनंदेखील पत्रकार परिषद घेत सिझानवर काही आरोप केले होते. यानंतर आता तुनिषाच्या काकांनी सिझानच्या कुटुंबीयांची चौकशी करण्याचं आवाहन केलं आहे.

आम्ही गृहविभागाकडे (Home Department) हे प्रकरण लवकरात लवकरत न्यायालयात नेण्याची विनंती केली आहे. यामध्ये सहभागी असलेल्या शीझानच्या कुटुंबीयांनादेखील आम्ही विनंती केली आहे. आत्महत्येच्या 15 दिवसांपूर्वीच सिझान आणि तुनिषाचं ब्रेकअप झालं होतं. या सगळ्या कटाचीही चौकशी झाली पाहिजे. असं तुनिषाच्या काकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, तुनिषा आणि सिझान यांचं ब्रेकअप 15 डिसेंबर रोजी झालं होतं. त्यानंतर तुनिषाला पॅनिक अ‌ॅटक (Panic attack) यायचे. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं न्यायालयानं सांगितलं आहे. मृत्यूपूर्वी तुनिषाला शेवटची भेटणारी व्यक्ती सिझान होती. सिझानवर लावण्यात आलेले आरोप सिझानच्या कुटुंबानं फेटाळून लावले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now