एक ग्लास दारु… आताच द्या लक्ष नाहीतर या गंभीर आजाराचा धोका!

On: August 10, 2023 1:02 PM
Health News
---Advertisement---

मुंबई | दारू (Alchohol) आरोग्यासाठी योग्य मानली जात नाही पण तरीही काही लोक रोज दारू पितात तर काही अधूनमधून. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून जे लोक दररोज किमान एक ग्लास दारू घेतात, त्यांचा रक्तदाब (blood pressureवेगाने वाढतो, अशी धक्कादायक माहिती समोर आलीये.

अमेरिकन असोसिएशन जर्नल हायपरटेन्शनमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. 1997 ते 2021 पर्यंतच्या 7 आंतरराष्ट्रीय अभ्यासातून असं आढळून आलंय की की जे लोक दिवसातून फक्त एक ग्लास वाइन घेतात त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका अधूनमधून मद्यपान करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त असतो.

उच्च रक्तदाबाची (High blood pressure) लक्षणे दिसू लागेपर्यंत त्याने शरीराचे बरेच नुकसान केलं आहे. जर बीपी नियंत्रणात नसेल तर ते अपंगत्व, खराब जीवन गुणवत्ता आणि अगदी हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होऊ शकतो.

संशोधनाशी निगडित ज्येष्ठ लेखक डॉ. मार्को व्हिसीटी यांनी सांगितलं की, जे तरुण मद्यपान करतात त्यांच्यामध्ये रक्तदाबाची पातळी जास्त असल्याचं जाणून आम्हाला आश्चर्य वाटलं. या लोकांचा रक्तदाब खूप मद्यपान केलेल्या लोकांपेक्षा खूपच कमी होता.

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now