कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारचा मोठा निर्णय

On: December 23, 2022 2:35 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | चीनमध्ये कोरोनानं((Corona Virus) पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळं कोरोनाचा धोका लक्षात घेता सतर्क होत केंद्र सरकारनंCenreal Goverment) विमानानं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

कोरोनाचे वाढते रूग्ण पाहून डाॅक्टरही चकीत होत आहेत. त्यामुळंच सरकारकडून सांगण्यात आलं आहे की, प्रत्येक आंतराष्ट्रीय फ्लाइटमध्ये येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांच्या कोरोना टेस्ट केल्या जातील.

काही देशात कोरोनाचे वाढलेले रूग्ण पाहून यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे नागरी उड्डाण मंत्रालयाला एक पत्र लिहिण्यात आलं आहे. तसेच मार्गदर्शक तत्वांमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की, प्रवेशाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे.

प्रवासाच्या वेळी कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशाला मानक प्रोटोकाॅलनुसार वेगळं केलं जाईल. तसेच प्रवासाच्या वेळी कोरोनाची लक्षणं असलेल्या रूग्णाला मास्क लावणं गरजेचं आहे, तसेच इतर प्रवाशांपासून वेगळं बसणं आवश्यक आहे आणि नंतर या प्रवाशाला उपचारासाठी आयसोलेशन सुविधेत पाठवण्यात येईल,असं पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान, गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, अशी सूचना केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळं कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनीच योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now