मुंबई | गौतमी पाटीलच्या(Gautami Patil) लावणीनं तरूणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. गौतमीची लावणी(Lavani) आणि तूफान गर्दी हे समीकरण आता सगळ्यांना ठाऊक झालं आहे. गौतमी आपल्या नृत्यामुळं यशाच्या शिखरावर पोहचली आहे.
गौतमीच्या लावणीला प्रतिसाद मिळत असला तरी गौतमीवर टीका करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. गौतमीच्या लावणीत अश्लीलता आहे असं म्हणत अनेक संघटना आणि कलाकारांनी तिच्या लावणीवर बंदी घालावी अशी मागणी केली होती.
अलीकडेच प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटीलच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत सातारा कोर्टानं गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
यापूर्वी गौतमीनं सर्वांची जाहीर माफी मागितली होती. तसेच माध्यमांना दिलेला एका मुलाखतीत गौतमी म्हटली होती की, यापूर्वी माझ्याकडून झाली असेल चूक परंतु आता माझ्या नृत्यात अश्लीलता नाही.
परंतु आता सातारा कोर्टाच्या निर्णयामुळं गौतमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच याचा परिणाम तिच्या लावणीच्या कार्यक्रमांवरही होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या-






