मद्यप्रेमींना राज्य सरकारचा मोठा झटका!

On: October 23, 2023 12:01 PM
Health News
---Advertisement---

मुंबई | येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात दारु महागणार आहे. तळीरामांना महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने जोरदार झटका दिला आहे. सरकारने मूल्यवर्धित कर म्हणजे VAT मध्ये ५% वाढीची घोषणा केली.

सरकारने 1 नोव्हेंबरपासून मूल्यवर्धित करात 5 टक्क्यांवडून 10 टक्के केला असून हा बदल फक्त क्लब, लाउंज आणि बारमध्ये दारू पिण्यासाठी लागू असेल. नॉन-काउंटर विक्री फक्त पूर्वीच्या किमतीवर असेल.

सरकारच्या या निर्णयाचा परिणाम मद्यविक्री क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सवर होण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचं मत आहे. आता गुंतवणूकदारांना काही शेअर्सवर लक्ष ठेवून राहावं लागेल.

या निर्णयामुळे युनायटेड स्पिरिट्स, युनायटेड ब्रुअरीज, रॅडिको खेतान, सुला विनयार्ड्स, टिळक नगर इंडस्ट्रीज, पिकाडिली ॲग्रो इत्यादींच्या शेअर्सवर परिणाम होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now