महाराष्ट्र बंदबाबत मराठा समाजाकडून मोठी घोषणा!

On: October 31, 2023 11:32 AM
---Advertisement---

सोलापूर | मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस (Maratha reservation) प्रश्नाने जास्तच पेटत चालला आहे. राज्यात विविध मार्गांनी आंदोलनं चालू आहेत. आरक्षणासाठी मराठवाड्यातील आंदोलक जास्तच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आंदोलन शांततेत चालू असतानाच, आंदोलनला गालबोट लागल्याचं पहायला मिळत आहे.

एकीकडे तणावाचं वातावरण सुरु असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र बंद असल्याच्या अफवा पसरत आहे. या व्यतरिक्त शाळा, महाविद्यालय हे सुद्धा बंद असल्याच्या पोस्ट व्हायरल केले जात आहेत. राज्यात अनेक ठिकाणी शाळा- महाविद्यालयात सहामाहीच्या सत्र परीक्षा चालू आहेत.

व्हायरल होत असलेल्या पोस्टमुळे पालक, शिक्षक यांची द्विधा मन:स्थिती झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने अधिकृत निर्णय जाहीर केला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने असा कोणताही बंद घोषित केलेला नाही, त्यांनी ‘महाराष्ट्र बंद’ची कोणतीही हाक दिली नाही, असं समोर आलंय.

मराठा समाज आक्रमक झाले असून अनेक राजकीये नेते मंडळींच्या घरांवर दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली आहे. दरम्यान बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराला आग लावण्यात आली आहे. याआधी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराला देखील आग लावल्याची तसेच माजलगाव नगरपरिषदेलाही आग लावल्याची घटना घडली होती.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now