वणी-नाशिक मार्गावर भीषण अपघात! एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

On: July 17, 2025 12:40 PM
ST Bus Accident
---Advertisement---

Nashik Accident | वणी-नाशिक रस्त्यावर दिंडोरी तालुक्यात गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये एका दोन वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे, ज्यामुळे हा अपघात आणखीनच हृदयद्रावक ठरतो. (vani nashik accident)

भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीला दिली धडक; मृतांमध्ये २ वर्षीय चिमुकला :

ही घटना दिंडोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर ही भीषण टक्कर झाली. कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या नाल्यात जाऊन पलटी झाली. यामध्ये कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या एमएच 04 डीवाय 6642 या क्रमांकाच्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर तोल गमावलेल्या कारने थेट पाण्याने भरलेल्या नाल्यात पलटी घेतली. अपघात इतका भीषण होता की, कारमधील सर्व सात जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. (vani nashik accident)

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे :

देविदास पंडित गांगुर्डे (वय 28)

मनीषा देविदास गांगुर्डे (वय 23)

उत्तम एकनाथ जाधव (वय 42)

अल्का उत्तम जाधव (वय 38)

दत्तात्रेय नामदेव वाघमारे (वय 45)

अनुसया दत्तात्रेय वाघमारे (वय 40)

भावेश देविदास गांगुर्डे (वय 2)

सर्व मृत दिंडोरी तालुक्यातील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Nashik Accident | पोलीस तपास सुरू, दिंडोरी तालुक्यात शोककळा :

घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य हाती घेण्यात आलं. कार पाण्याच्या नाल्यात उलटल्याने मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागला. मृतांचे शव ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

या भीषण दुर्घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. अपघातात एका कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

News Title: 7 Dead, 2 Critical in Horrific Car Accident on Vani-Nashik Road in Dindori Taluka

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now