’60 टक्के भारतीय मोफत अन्नधान्यावर जगतात, हे प्रगत…’; नारायण मूर्तींचं नवं वक्तव्य चर्चेत

On: January 21, 2025 12:17 PM
Free Food
---Advertisement---

Free Food l इन्फोसिसचे (Infosys) सह-संस्थापक (Co-founder) नारायण मूर्ती यांनी पुन्हा एकदा चर्चेला तोंड फोडले आहे. यावेळी त्यांनी भारतातील दारिद्र्यावर (Poverty in India) भाष्य केले आहे. देशातील 60 टक्के भारतीय दर महिन्याला मोफत अन्नधान्यावर (Free Food Grains) अवलंबून आहेत, असे सांगत इतके दारिद्र्य हे आर्थिकदृष्ट्या (Economically) भक्कम देशाचे लक्षण (Sign) नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दारिद्र्य आणि प्रगतीवर भाष्य :

इन्फोसिसच्या सहसंस्थापकांनी केलेल्या वक्तव्यातून एक वेगळा दृष्टिकोन त्यांनी सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. ‘आपण जर जास्त मेहनत (Hard Work) घेतली, जास्त चांगलं काम केलं, जास्त पैसे कमवले आणि जास्त कर (Tax) दिला तरच त्या मुलाचं (गरीब मुलाचे) भविष्य (Future) उज्वल होऊ शकेल’, असे ते म्हणाले.

यादरम्यान त्यांनी जर्मन समाजशास्त्रज्ञ (German Sociologist) मॅक्स वेबर (Max Weber) यांचाही उल्लेख केला. एखादी चांगली व्यक्ती, जी मेहनती आहे, महत्त्वाकांक्षी (Ambitious) आहे, त्या व्यक्तीची बुद्धी तल्लख (Intelligent) आहे, शिस्तप्रिय (Disciplined) आहे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये देशाला प्रगतीच्या (Progress) वाटेवर नेऊ शकतात हा विचार त्यांनी सर्वांपुढे ठेवला.

यावेळी त्यांनी आणखी एका मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. आज देशातील 60 टक्के भारतीय दर महिन्याला मोफत अन्नधान्यावर अवलंबून असल्याचे सांगत, इतके दारिद्र्य एखाद्या आर्थिक स्वरूपातील भक्कम देशाचा गुणविशेष नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

या विधानांतून मूर्ती यांनी भारतासमोरील आर्थिक आव्हानांवर (Economic Challenges) बोट ठेवले आहे. तसेच, त्यांनी प्रगतीसाठी वैयक्तिक जबाबदारीवरही (Personal Responsibility) भर दिला आहे.

Free Food l 70 तासांच्या वक्तव्याचा संदर्भ :

नारायण मूर्ती यांनी काही दिवसांपूर्वीच, नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा (Employees) कार्यालयीन आठवडा 70 तासांचा असावा असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका (Criticism) झाली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा याच मुद्द्याला अनुसरून वक्तव्य केले आहे. 70 तासांच्या कार्यालयीन आठवड्यासंदर्भातील वक्तव्यानंतर मूर्ती यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्याचसंदर्भात आता त्यांनी आपली बाजू मांडत, कोणीही कोणाही व्यक्तीला दीर्घकाळ, तासन्तास काम करण्यासाठी सांगू शकत नाही किंबहुना गरजही नाही. पण, प्रत्येकाने ही बाब स्वतःहून समजून घ्यावी, विचार करावा असे ते म्हणाले.

News Title : 60 percent of Indians live on free food

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now