25 आमदार राजीनामा देणार?; अजित पवार गटातील आमदाराचा इशारा

On: October 13, 2023 11:55 AM
---Advertisement---

नाशिक | आदिवासीतून कुणाला आरक्षण देता कामा नये. आम्हाला 47 जाती म्हणून आरक्षण मिळाले. पण, 48 वी जात आरक्षणात घेतली जाऊ नये. आपल्याला रडायचं नाही, तर लढायचं आहे, असं अजितदादा गटातील (Ajit Pawar) आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhai Zirval) यांनी म्हटलं आहे.

आदिवासी बांधवांचा उलगुलान मोर्चा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दाखल झाला. यावेळी बोलताना नरहरी झिरवळ चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

आम्ही सर्व आदिवासी आमदार मंगळवारी पक्षप्रमुखांकडे राजीनामा देणार आहोत. आम्ही 25 जणांनी मनावर घेतलं तर कुठलचं सरकार राहणार नाही. सगळे आमदार राजीनामा देतील, असा इशारा नरहरी झिरवाळ यांनी दिला.

दरम्यान, मला वर बसून मुद्दे मांडता येत नाही, म्हणून मी यांना मुद्दे मांडायला देतो. आता आपल्याला डोक्याने लढायचं आहे, असं नरहरी झिरवळ म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now