पोलिसांच्या ‘त्या’ एका चुकीमुळे निलेश घायवळ फरार! जाणून घ्या नेमकी चूक काय?

On: October 7, 2025 2:45 PM
Nilesh Ghaiwal
---Advertisement---

Nilesh Ghaiwal | खंडणीप्रकरणात जामीन देताना न्यायालयाने नीलेश घायवळला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते, तरीही तो जमा झाला नाही आणि तो परदेशात गेल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर 2019 मधील पासपोर्ट चारित्र्य पडताळणीमध्ये झालेली गंभीर चूक आता पोलिस यंत्रणेला महागात पडल्याची चर्चा आहे.

दाखल गुन्ह्यांनंतरही घायवळला (Nilesh Ghaiwal) पासपोर्ट कसा मिळाला, याचे उत्तर ‘स्पेलिंग’मध्ये दडलेले असल्याचे पुढे आले आहे. नावातील एका अक्षराच्या फरकामुळे पोलिसांच्या गुन्हे नोंदी पडताळणीला घायवळची माहिती जुळलीच नाही आणि त्याला पासपोर्ट मंजूर झाला. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

2019 ची चूक नेमकी कोणती? — ‘घायवळ’ विरुद्ध ‘गायवळ’ :

घायवळकडे एकच पासपोर्ट असून तो ‘नीलेश गायवळ’ (Nilesh Ghaiwal) या नावाने जारी झाल्याचे समोर आले; तर पोलिसांच्या गुन्हे नोंदीत त्याचे नाव ‘नीलेश घायवळ’ असे होते. याच एका अक्षराच्या फरकामुळे (घ/ग) 2019 मधील पासपोर्ट पडताळणीवेळी त्याच्यावरील गुन्हे नोंदी सिस्टमला सापडल्या नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. परिणामी त्याला सहजतेने पासपोर्ट मिळाला आणि तो परदेश प्रवासासाठी पात्र ठरला.

सध्या पोलिसांनी पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधून ‘नीलेश गायवळ’ या नावाने जारी पासपोर्टचे तपशील मागवले आहेत. त्यावरून परदेश प्रवासाचे वेळापत्रक, परवानग्या आणि वापर याबाबतची माहिती गोळा केली जात आहे, ज्याच्या आधारावर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे.

Nilesh Ghaiwal | 2021 चा न्यायालयीन आदेश मोडीत; जबाबदारी कुणाची? :

खंडणीप्रकरणात 2021 मध्ये जामीन देताना न्यायालयाने घायवळला पासपोर्ट जमा करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. तो जमा झाला का, नसेल तर पोलिसांनी सक्तीची कार्यवाही का केली नाही — हे प्रश्न आता हवेत झुलत आहेत. तेव्हाच चौकशी झाली असती तर पासपोर्ट आणि नावातील तफावत उघड झाली असती, असे पोलिस दलातल्या चर्चेत म्हटले जात आहे. (Nilesh Ghaiwal News)

दरम्यान, घायवळ टोळीवर कोथरुड परिसरातील हल्ल्यांसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी छापे टाकून मालमत्ता जप्ती, परदेशप्रवास तपशील संकलन अशा मार्गांनी तपास वेगात सुरू केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याने त्याच्याविरोधात पुढील कठोर पावले उचलली जाणार आहेत.

News Title: One-Letter Lapse: 2019 Police Verification Error Let ‘Nilesh Gaiwal’ Get Passport; Bail Order Breach Fuels Manhunt in Pune

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now