राजस्थानमध्ये 19 नवे जिल्हे, महाराष्ट्रातही 22 नव्या जिल्ह्यांचा प्रस्ताव?

On: August 9, 2023 4:33 PM
Eknath Shinde
---Advertisement---

मुंबई | निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. वित्त आणि विनियोग विधेयकावर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री गेहलोत यांनी अनेक घोषणा केल्या. यात राज्यात 19 नवीन जिल्हे आणि 3 नवीन विभागीय मुख्यालये निर्माण करण्याची घोषणा गेहलोत सरकारने केली आहे.

राज्याची प्रशासकीय रचना मजबूत करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. यानंतर महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांच्या प्रस्तावाचं काय? असा प्रश्न विचारला जातोय. महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा राज्यात 26 जिल्हे होते. त्यानंतर 10 नव्या जिल्ह्यांची निर्मीती झाली. (22 new districts proposed in Maharashtra)

देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) काळात मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करुन नव्या जिल्ह्यांच्या (New districts in Maharashtra) निर्मितीच्या मागण्यांचा अभ्यास केला होता. वित्त, महसूल, नियोजन विभागाचे सचिव, विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या समितीत होते. या समितीने महाराष्ट्रात नवे 22 जिल्हे आणि 49 नवे तालुके असा प्रस्ताव या समितीसमोर होता. मात्र समितीने दिलेल्या अभिप्रायामुळे नव्या जिल्हानिर्मितीचे घोडं अडलेलं आहे.

या 18 जिल्ह्याचं विभाजन?

नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण

ठाणे जिल्ह्यातून- मीरा-भाईंदर आणि कल्याण

बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव

यवतमाळ जिल्ह्यातून पुसद

अमरावती जिल्ह्यातून अचलपूर

भंडारा जिल्ह्यातून साकोली

चंद्रपूर जिल्ह्यातून चिमूर

गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी

जळगाव जिल्ह्यातून भुसावळ

लातूर जिल्ह्यातून उदगीर

बीड जिल्ह्यातून अंबेजोगाई

नांदेड जिल्ह्यातून किनवट

सातारा जिल्ह्यातून माणदेश

पुणे जिल्ह्यातून शिवनेरी

पालघर जिल्ह्यातून जव्हार

रत्नागिरी जिल्ह्यातून मानगड

रायगड जिल्ह्यातून महाड

अहमदनगर – शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर

महत्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now