ड्रग्जचं व्यसन, पैशांसाठी पुरुषांसोबत शरीरसंबंध…; तरूणीने उडवली १९ पुरुषांची झोप

On: August 9, 2025 1:41 PM
Pune News
---Advertisement---

Crime News | उत्तराखंडमधील रामनगर शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका १७ वर्षीय तरुणीमुळे जवळपास १९ पुरुषांना एचआयव्हीची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नैनीताल जिल्ह्यातील गुलरघट्टी परिसरात प्रथम समोर आली होती. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.

१९ पुरुषांना एचआयव्हीची लागण

मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी ड्रग्जच्या व्यसनाच्या आहारी गेली होती. ड्रग्ज खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे तिने स्थानिक पुरुषांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास सुरुवात केली.

गेल्या दीड वर्षांत ती अनेक पुरुषांच्या संपर्कात आली आणि त्यापैकी किमान १९ पुरुषांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे. ती तरुणी यातून मिळणारे पैसे तिच्या ड्रग्जच्या व्यसनासाठी वापरत होती.

पैशांसाठी पुरुषांसोबत शरीरसंबंध

हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले जेव्हा परिसरातील अनेक तरुणांना गंभीर आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. त्यांनी रामदत्त जोशी संयुक्त रुग्णालयातील एकात्मिक समुपदेशन आणि चाचणी केंद्रात (ICTC) संपर्क साधला. त्यांच्या तपासणीमध्ये ते एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. यातील काही पुरुषांनी तर विवाहित पुरुषांशीही संबंध ठेवले होते, ज्यामुळे त्यांच्या पत्नींनाही एचआयव्हीची लागण झाल्याची शक्यता आहे, असे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

एका तरुणाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती शेअर केली. त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे की, “नैनीताल, उत्तराखंड येथे १७ वर्षीय मुलीमुळे १९ तरुणांना एचआयव्हीचा संसर्ग झाला. ती ड्रग्जच्या आहारी गेली आहे आणि व्यसनासाठी पैसे मिळवण्यासाठी तिने पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवले. पुरुषांना माहिती नव्हते की ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे.”

या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. काही लोकांनी यावर प्रतिक्रिया देताना, त्या पुरुषांनी अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले, जो कायद्याने दंडनीय गुन्हा आहे, याकडे लक्ष वेधले आहे.

English Title: Shocking! 19 Men Test HIV Positive Due to a Teenager’s Drug-Fueled Prostitution

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now