पिंपरी चिंचवडकरांसाठी पाण्यासंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी!

On: June 24, 2026 2:56 PM
Pimpri Chinchwad Water Cut
---Advertisement---

Pimpri Chinchwad Water Cut | पिंपरी-चिंचवड(Pimpri Chinchwad) शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पावसाने उशीर केल्याने आणि एल-निनो(El-Nino)च्या परिणामामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासनाने आता 15 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात उद्यापासून अंमलात येणार असून नागरिकांना पाण्याचा वापर अधिक काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धरणांतील घटता साठा वाढवतोय चिंता :

शहरासाठी मुख्य जलस्रोत असलेल्या पवना धरण(Pavana Dam) परिसरातील उपलब्ध पाणीसाठा आता चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या धरणात केवळ 19 टक्के उपयुक्त पाणी शिल्लक राहिले असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय चिखली आणि इतर समाविष्ट भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या आंद्रा धरण(Andra Dam) क्षेत्रातील जलसाठाही कमी होत चालला आहे. वाढत्या तापमानामुळे धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असून पाण्याची पातळी दिवसागणिक घटत आहे.

सध्याचा उपलब्ध साठा जास्तीत जास्त 31 जुलैपर्यंत पुरू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने थेट हस्तक्षेप करत पिंपरी-चिंचवड महापालिका(Pimpri Chinchwad Municipal Corporation) प्रशासनाला धरणातून दिल्या जाणाऱ्या पाण्यात 15 टक्के कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे शहरातील पाणी व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Pimpri Chinchwad Water Cut | पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम :

महापालिका दररोज रावेत(Ravet) येथील जल उपसा केंद्राच्या माध्यमातून पवना धरणातून सुमारे 500 एमएलडी अशुद्ध पाणी उचलते. त्यानंतर निगडी प्राधिकरण(Nigdi Pradhikaran) सेक्टर 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात या पाण्यावर प्रक्रिया करून संपूर्ण शहरात पुरवठा केला जातो. दुसरीकडे आंद्रा धरणातून निघोजे(Nigoje) बंधाऱ्याजवळून दररोज 90 दशलक्ष लिटर पाणी उचलले जाते आणि चिखली प्रकल्पात त्याचे शुद्धीकरण केले जाते.

आता धरण पातळीवरच पाण्याच्या उपलब्धतेत कपात होणार असल्यामुळे शहराला मिळणाऱ्या एकूण पाण्याचे प्रमाण कमी होणार आहे. आधीपासूनच 2018 पासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच नव्याने लागू होणाऱ्या 15 टक्के कपातीमुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, गळती टाळण्याचे आणि अनावश्यक अपव्यय रोखण्याचे आवाहन केले आहे.

News title : 15 Percent Water Cut In Pimpri Chinchwad

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now