युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मामध्ये घटस्फोट?, धक्कादायक माहिती समोर

On: February 8, 2025 1:21 PM
Yuzvendra Chahal & Dhanashree Verma
---Advertisement---

Yuzvendra Chahal | भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) स्टार फिरकी गोलंदाज (Star Spinner) युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाच्या (Divorce) बातम्यांमुळे ते दोघेही चर्चेत आहेत. अशातच, एक धक्कादायक दावा समोर आला आहे.

चहलने धनश्री वर्मासोबत सेटलमेंट केले?

दाव्यानुसार, चहलने धनश्री वर्मासोबत सेटलमेंट (Settlement) केले आहे. या सेटलमेंटसाठी चहलने धनश्री वर्माला कोट्यवधी रुपये दिले आहेत. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होणाऱ्या एका पोस्टमध्ये (Post) असा दावा केला जात आहे की, चहलने धनश्री वर्माशी सेटलमेंट करण्यासाठी तिला 60 कोटी रुपये दिले आहेत.

सोशल मीडियावर आतापर्यंत अनेक दावे केले गेले आहेत, त्यापैकी बहुतेक चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आहे. 60 कोटी रुपयांच्या सेटलमेंट दाव्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती (Official Information) समोर आलेली नाही. त्यामुळे या दाव्याच्या सत्यतेबद्दल शंका आहे. (Yuzvendra Chahal)

युजवेंद्र चहलची ‘ती’ पोस्ट ठरतेय चर्चेचा विषय

काही दिवसांपूर्वी युजवेंद्र चहलने(Yuzvendra Chahal) इन्स्टाग्रामवर (Instagram) एक स्टोरी (Story) पोस्ट केली होती. फोटो शेअर करत त्यासोबत एक कॅची (Catchy) कॅप्शन (Caption) दिले होते. युजीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खरं प्रेम दुर्मिळ होत चाललं आहे आणि मी स्वतः दुर्मिळ आहे.” यासोबत युजवेंद्रने एक हसण्याचा इमोजी (Emoji) शेअर केला आहे. त्यामुळे चहलच्या मनात नेमके काय चालले आहे? असा प्रश्न चाहते करत आहेत. अशातच सोशल मीडियावर दोघांच्या या पोस्टमुळे अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत.

दरम्यान, या दोघांनी २०२० मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती. परंतु, दोघांमध्ये सध्या काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. युजवेंद्रने धनश्रीसोबतचे फोटो सोशल मीडियावरुन डिलीट (Delete) केले आहेत. तर, धनश्रीने युजवेंद्रचे आडनावही आपल्या नावासमोरून हटवले (Removed Surname) आहे.

Title : Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce Rumours

 

Join WhatsApp Group

Join Now