हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? तर घरच्या घरी बनवा नैसर्गिक क्रीम

On: November 14, 2025 1:59 PM
Winter Skincare
---Advertisement---

Winter Skincare | हिवाळा सुरु होताच वातावरणातील गारवा वाढतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसू लागतो. चेहरा कोरडा पडणे, खाज येणे, निस्तेजपणा आणि त्वचेची चमक कमी होणे या समस्या जवळजवळ प्रत्येकालाच जाणवतात. घराबाहेरचा धूर, धूळ, प्रदूषण आणि घरातील गरम पाण्याचा जास्त वापर यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवणे कठीण होते. त्यामुळे हिवाळ्यात स्किनकेअरची योग्य काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. (Winter Skincare)

दिवसभर केमिकलयुक्त फेसवॉश, मेकअप प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर चेहर्यावर त्यांचे अवशेष राहतात. यामुळे त्वचा आणखी कोरडी आणि राठ होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा नीट धुणे आणि योग्य नाइट स्किनकेअर रुटीन Follow करणे आवश्यक आहे. या काळात मॉइश्चरायझिंग नाईट क्रीमचा वापर त्वचेला आतून पोषण देतो आणि ओलावा टिकवून ठेवतो.

हिवाळ्यासाठी घरची नैसर्गिक नाईट क्रीम कशी तयार कराल? :

त्वचा कोरडी पडू नये आणि तिची चमक कायम राहावी यासाठी घरच्या घरी नैसर्गिक नाईट क्रीम तयार करणे सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय आहे. ही क्रीम पूर्णपणे केमिकल-फ्री असून ड्रायनेसवर प्रभावीपणे काम करते. क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे – एलोव्हेरा जेल किंवा गर, गुलाबपाणी, बदाम तेल, ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूल. हे सर्व घटक त्वचेला अॅन्टीऑक्सिडंट्स आणि हायड्रेशन देतात. (Winter Skincare)

क्रीम तयार करण्यासाठी एका स्वच्छ भांड्यात एलोव्हेराचा गर घ्या. त्यात गुलाबपाणी, 4–5 थेंब बदाम तेल, थोडी ग्लिसरीन आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा अर्क घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण एकसारखे झाल्यावर ते एअरटाइट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. ही क्रीम 7–10 दिवस सहज टिकते.

Winter Skincare | रात्री लावा आणि मिळवा तजेलदार, मऊ आणि हायड्रेटेड त्वचा :

ही नैसर्गिक नाईट क्रीम दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. क्रीम त्वचेतील कोरडेपणा दूर करते, सुरकुत्या आणि फाईन लाइन्स कमी करण्यात मदत करते. एलोव्हेरामुळे त्वचा शांत होते आणि गुलाबपाणी तजेला वाढवते. बदाम तेल त्वचेला व्हिटॅमिन ई पुरवते तर ग्लिसरीन त्वचेतील ओलावा लॉक करून ठेवते. (Winter Skincare)

ही क्रीम त्वचेच्या खोलवर जाऊन पेशी दुरुस्त करते, माईश्चरायझिंग लेयर तयार करते आणि हिवाळ्यात होणाऱ्या ड्रायनेसला पूर्णविराम देते. नियमित वापराने त्वचा मऊ, तजेलदार आणि निरोगी दिसू लागते. हिवाळ्यामुळे होणारी खाज, लालसरपणा आणि त्वचा सोलणे यावरही ही क्रीम उपयुक्त ठरते.

News Title: Winter Skincare: DIY Night Cream to Treat Dry Skin and Restore Glow

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now