छत्रपती संभाजीनगर | शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठा दावा केलाय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हे 31 डिसेंबरला सरकार पडणार असे आघाडीतील मोठे जाऊ नयेत म्हणून मुद्दामहून पसरवत आहेत. आघाडीतील मोठे नेते 31 डिसेंबरला फुटणार आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.
“आघाडीतील मोठे नेते 31 डिसेंबरला फुटणार”
हिवाळी अधिवेशन एक पिकनिक म्हणून पाहीले जाते. परंतू हे अधिवेशन आमचे सरकार जनतेच्या मदतीसाठी प्रश्न जाणून घेण्यासाठी घेणार आहे. त्यामुळे कालावधी वाढला असल्याचे त्यांनी सांगितलं. आघाडीतील मोठे नेते महायुतीत 31 डिसेंबरपर्यंत येतील, कदाचित नव्या वर्षांत येतील अशी माहीती आहे. सगळ्या गोष्टी आताच उघड करीत नाही. परंतू 31 डिसेंबरपर्यंत वाट पाहा असंही शिरसाट यांनी सांगितलं.
“ओबीसी आरक्षणाला धक्का न लावसा मराठ्यांना आरक्षण देणार”
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण दिले जाणार असल्याचे आमदार संजय शिरसाठ यांनी म्हटले आहे. नेत्यांनी विविध स्टेटमेंट दिल्याने वाद निर्माण होत आहेत. समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने करु नयेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
कॅसिनोचा व्हिडीओ आणि राज्याचा काय संबंध आहे. जरी कॅसिनोमध्ये गेलं तर काय चुकलं? गोव्यातील हॉटेलमध्ये रशियन मुलींबरोबर हे काय करत होते. प्रचाराच्या नावाने हॉटेलमध्ये जात होते. तुम्ही लंडनमध्ये जाऊन काय हनुमान चालिसा वाचत नाही, यांचे व्हिडीओ बाहेर काढले तर पळता भुई थोडी होईल, असं म्हणत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.
दरमयान, मंत्रीमंडळाचा विस्तार अधिवेशनाआधी होणार का ? या प्रश्नावर याबाबत तिन्ही महारथींनाच माहीती असेल, तेच यावर योग्य ते उत्तर देतील असंही शिरसाट यांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-






