प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ! काय आहे यामागचं कारण?

On: April 10, 2025 10:20 AM
Prashant Koratkar
---Advertisement---

Prashant Koratkar l इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानप्रकरणी अटकेत असलेला प्रशांत कोरटकर याच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहेत. न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतरही कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे कोरटकरला कळंबा कारागृहातून अद्यापही सोडण्यात आलेले नाही.

बुधवारी उशिरा न्यायालयाने प्रशांत कोरटकरला काही अटींसह ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. मात्र, संबंधित कागदपत्रांची पूर्तता बुधवारी सायंकाळपर्यंत न झाल्यामुळे त्याची सुटका लांबली आहे. त्यामुळे सध्या तरी कोरटकरचा मुक्काम कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातच कायम राहणार आहे.

आज कागदपत्रांची पूर्तता झाली तरच सुटका :

कोरटकरच्या सुटकेसाठी आज (१० एप्रिल) आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली, तरच त्याला कारागृहातून बाहेर सोडण्यात येईल. अन्यथा, त्याचा मुक्काम उद्यापर्यंत कारागृहातच राहणार आहे. त्याच्या वकिलांनी या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणामुळे कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. कोरटकरवर याआधी दोनवेळा हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे न्यायालयात त्याच्या वकिलांनी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

Prashant Koratkar l काय आहे प्रकरण? :

प्रशांत कोरटकरवर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवले होते.

सध्या कोरटकर कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असून, सुटकेसाठीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. येत्या काही तासांत परिस्थिती स्पष्ट होईल, पण तोपर्यंत कोरटकरची सुटका रखडण्याची शक्यता आहे.

News Title: Will Prashant Kortkar Stay Longer in Jail? Bail Granted but Paperwork Delays His Release

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now