UPI Credit Line | डिजिटल पेमेंटच्या जगात UPI आता आणखी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. नव्या फीचर्समुळे ग्राहकांना थेट UPI वरून छोटे कर्ज मिळणार असून तेही ठराविक कालावधीपर्यंत व्याजाशिवाय वापरता येणार आहे. यामुळे क्रेडिट कार्डवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषतः लवचिक परतफेड पद्धतीमुळे ग्राहकांसाठी ही सुविधा अधिक फायदेशीर ठरणार आहे.
सध्या क्रेडिट कार्डवर (Credit Card) खरेदी केल्यानंतर एक महिना किंवा सव्वा महिन्याचा ग्रेस पीरियड मिळतो. त्यानंतर मात्र चक्रवाढ व्याज आकारले जाते. याच धर्तीवर आता UPI क्रेडिट लाईनवरही अशीच सुविधा देण्याची तयारी करण्यात आली आहे. बँका आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यातील चर्चा यशस्वी ठरल्यास ग्राहकांना UPI च्या माध्यमातून सहज कर्ज उपलब्ध होणार आहे. (UPI loan)
काय आहे UPI क्रेडिट लाईनचा नवा प्लॅन? :
NPCI च्या नव्या प्लॅननुसार UPI क्रेडिट लाईनमध्ये आता क्रेडिट कार्डप्रमाणेच ग्रेस पीरियड मिळणार आहे. या कालावधीत ग्राहकांना कोणतेही व्याज द्यावे लागणार नाही. ठराविक मुदतीत रक्कम परत केल्यास अतिरिक्त शुल्क किंवा दंडही आकारला जाणार नाही. त्यामुळे बिल भरणे, वस्तू खरेदी करणे किंवा इतर खर्चांसाठी ग्राहकांना क्रेडिट कार्डप्रमाणेच सुविधा मिळणार आहे. (digital payments India)
यापूर्वी UPI क्रेडिट लाईन वापरताच लगेच व्याज लागू होत असल्यामुळे ही सुविधा फारशी लोकप्रिय झाली नव्हती. मात्र, आता व्याजमुक्त कालावधी मिळाल्याने UPI कर्ज सेवा अधिक आकर्षक ठरणार आहे आणि सामान्य ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल.
UPI Credit Line | काही बँकांनी आधीच सुरू केली सेवा :
काही बँकांनी ही सुविधा आधीच सुरू केली आहे. येस बँकेने UPI क्रेडिट लाईनवर 45 दिवसांपर्यंत व्याजमुक्त परतफेडीची सुविधा दिली आहे, तर सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने 30 दिवसांचा ग्रेस पीरियड उपलब्ध करून दिला आहे. काही बँका एफडीवर आधारित क्रेडिट सुविधा देत असून त्यावर कॅशबॅक आणि व्याजाचेही फायदे मिळत आहेत. (UPI Credit Line)
या नव्या घडामोडींमुळे भविष्यात क्रेडिट कार्ड कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. ग्राहकांना कमी खर्चात, सोप्या पद्धतीने आणि जलद कर्ज मिळाल्यास डिजिटल पेमेंट क्षेत्रात UPI चा प्रभाव आणखी वाढणार आहे.






